Saturday, May 18, 2024
HomeदेशAyodhya : अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणानंतर २० हजारांहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचा...

Ayodhya : अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणानंतर २० हजारांहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचा अंदाज

अयोध्या : अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. ही धार्मिक बाजू झाली. पंरतु धार्मिक नाण्याची दुसरी बाजू म्हणजे अयोध्या परिसरात राम मंदिरामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असून अर्थकारणालाही गती मिळणार आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायाशी संबंधित दुसरे सेक्टरसुद्धा ही संधी साधून घेण्यासाठी खूप उत्साहीत आहेत. खासकरुन हॉस्पिटलॅटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्म सेक्टरला खूप बूस्ट मिळणार आहे.

२२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येत दररोज येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. भक्तांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तिन्ही इंडस्ट्रीमध्ये जवळपास २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये नोकऱ्या वाढतील अशी स्टाफिंग कंपन्यांना अपेक्षा आहे. पुढची २० ते ३० वर्ष अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाणार आहे.

रेडस्टँड इंडियामध्ये स्टाफिंग आणि रेडस्टँड टेक्नोलॉजीजे चीफ कमर्शियल ऑफिसर यशब गिरी यांनी सांगितले की, ‘अयोध्येत पुढची काही वर्ष दररोज ३ ते ४ लाख भाविक येतील, ते एक ग्लोबल टूरिज्म सेंटरमध्ये बदलणार आहे. या भागात निवासी व्यवस्था आणि ट्रॅव्हलच्या मागणीत वाढ झाली आहे. अयोध्येच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. भाविकांसाठी पायभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येईल. रेडस्टँडला अपेक्षा आहे की, दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच २० हजारापासून ते २५ हजारापर्यंत कायमस्वरुपी आणि तात्पुरत्या स्वरुपात तयार होतील. हॉटेल स्टाफ, हाऊसकिपिंग, फ्रंट-डेस्क मॅनेजर, शेफ आणि टूर गाइड या क्षेत्रात नोकऱ्या वाढतील’.

‘मागच्या सहा महिन्यात हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्मशी संबंधित कमीत कमी १० हजार आणि जवळपास २०,००० नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत’ असे टीमलीजचे कंज्यूमर एवं ईकॉमर्स वाइस प्रेसीडेंट आणि हेड बालासुब्रमण्यम ए यांनी सांगितले आहे. यात हॉटेल कर्मचारी, शेफ, सर्वर्स, ड्राइव्हरचा समावेश आहे. हॉस्पिटॅलिटी सेक्टरच्या अधिकाऱ्यांनुसार हॉस्पिटॅलिटी मॅनेजर्स, रेस्टॉरंट आणि हॉटल कर्मचारी, लॉजिस्टिक्स मॅनेजर्स, ड्रायव्हर्स आदी क्षेत्रात नोकऱ्या या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. फक्त अयोध्येतच नाही, लखनऊ, कानपूर, गोरखपूरमध्ये मागणी आणि पुरवठा याची काय स्थिती असेल, यावर हॉटेल कंपन्या आणि रेस्टॉरंट मालकांची नजर असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -