Friday, May 17, 2024
HomeदेशISRO: चंद्रानंतर आता इस्रो करणार सूर्यावर स्वारी

ISRO: चंद्रानंतर आता इस्रो करणार सूर्यावर स्वारी

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (moon south pole) भारताच्या यानाने बुधवारी यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर आता शास्त्रज्ञ सूर्याच्या (sun mission) दिशेने आपली पावले टाकत आहेत. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले.

इस्रोने हे यश साजरे करत असतानाच सूर्यावर आता यान पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे. सूर्यावर संशोधन करण्यासाठी आपल्या आदित्य एल१ला सूर्याच्या दिशेने रवाना करणार आहे.

४ महिन्यात १५ लाख किमीचा टप्पा

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, सूर्य मिशनसाठी आदित्य एल १ उपग्रह सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाणार आहे. हे मिशन १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांत १५ लाख किमीचे अंतर पार करून सूर्याच्या कक्षेत पोहोचेल. तेथील सौर वातावरणाचा अभ्यास करून आकडे एकत्रित करून पृथ्वीवर पाठवणार.

या ठिकाणाहून लाँच होणार

आदित्य एल १चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले जाणार आहे. तेथे सूर्याचा अभ्यास करणारी अंतराळावर आधारित भारतीय वेधशाळा तयार केली जात आहे.

सूर्यदेवाच्या नावाने मिशन

आदित्य एल१ हे नाव सूर्यदेवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे भारतीय रॉकेट पीएसएलव्ही द्वारे सोडले जाईल. सूर्य मोहिमेनंतर गगनयान मिशन पुढे जाईल. हे मिशन भारताच्या मनुष्य अंतराळ मिशनचा भाग आहे.

शुक्र ग्रहही आहे यादीत

इस्रोच्या यादीत शुक्र ग्रहाचाही समावेश आहे. लवकरच इस्त्रो शुक्र ग्रहावरही अभ्ासासाठी यान पाठवणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -