Saturday, May 18, 2024
HomeदेशIsrael Hamas war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन करणार इस्त्रायलचा दौरा

Israel Hamas war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन करणार इस्त्रायलचा दौरा

तेल अवीव : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(US President Jo Biden) बुधवारी इस्त्रायल दौऱ्यावर जात आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, हमासच्या या लढाईदरम्यान त्यांचा हा एकजूट दाखवण्याचा दौरा असेल यात ते जॉर्डन आणि इजिप्त येथेही जातील तसेच तेथील राष्ट्राध्यक्षांची भेट घेतील. यासोबतच इस्त्रायल आणि वॉशिंग्टन गाजाच्या मदतीसाठी एक योजना विकसित करण्याबाबत सहमत झाले आहेत.

ब्लिंकन यांनी ७ ऑक्टोबरला हमासकडून केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या दुसऱ्या दौऱ्याबाबत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह संरक्षण मंत्रालयात तब्बल ८ तास चर्चा केली. ब्लिंकन मंगळवारी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्त्रायलसोबत अमेरिकेची एकजूटता आणि त्यांच्या सुरक्षेसाठी दृढ प्रतिबद्धता याला दुजोरा देतील.

ब्लिंकन पुढे म्हणाले, इस्त्रायलकडे आपल्या लोकांना हमास आणि इतर दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी आणि भविष्यातील हल्ले रोखण्याचा अधिकार तसेच वास्तवात कर्तव्य आहे. बायडेन इस्त्रायलला गेल्यावर हे जाणून घेणार की त्यांना आपल्या सुरक्षेसाठी काय हवे कारण आम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काँग्रेससोबत काम करणे सुरू ठेवू.

ब्लिंकन पुढे म्हणाले, अमेरिकाने इस्त्रायल येथून गाझा पट्टीत परदेशी मदत पोहोचण्यासाठी काम करण्याचेही आश्वासन दिले आहे. बायडेन यांना आशा आहे की इस्त्रायलकडून हे जाणून घेणार की त्यांनी आपले अभियान कसे संचलित करावे यामुळे होणारी जिवीतहानी टाळता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -