Monday, May 13, 2024
Homeक्रीडाआयपीएलचा हंगाम संपला; पण चर्चा तर होणारच...

आयपीएलचा हंगाम संपला; पण चर्चा तर होणारच…

विजेत्यांवर झाली पैशांची बरसात..

अहमदाबाद/मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या (आयपीएल) १५ व्या हंगामाचा नवा कोरा चॅम्पियन मिळाला आहे. विशेष म्हणजे प्रथमच आयपीएल खेळणाऱ्या ‘गुजरात टायटन्स’ने पहिल्याच सत्रात राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करून या हंगामाचे विजेतेपद पटकावले आणि इतिहास रचला. तर राजस्थान रॉयल्सच्या या पराभवामुळे १४ वर्षानंतर दुसरे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे.

तसेच विजयानंतर गुजरातवर बीसीसीआयकडून पैशांची बरसात झली आहे. गुजरातला चॅम्पियन ट्रॉफीसह २० कोटी रुपयांची बक्षीसाची घसघशीत रक्कमही मिळाली. तर उपविजेत्या राजस्थानलाही १२.५ कोटी रुपये मिळाले आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बंगळुरूलाही ७ कोटी व चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊला ६.५ कोटींचे रोख पारितोषिक मिळाले.

संघांव्यतिरिक्त या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनीही भरपूर कमाई केली. सर्वाधिक विकेट घेणारा राजस्थानच्या युजवेंद्र चहलला पर्पल कॅपसह १० लाख रुपये मिळाले. चहलने या मोसमात २७ विकेट घेतल्या.
त्याचवेळी या मोसमात सर्वाधिक धावा करणारा राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याला ऑरेंज कॅपसह १० लाख रुपये मिळाले. बटलरने १७ सामन्यात ८६३ धावा फटकावल्या.

अंतिम सामन्यातील सामनावीर हार्दिक पांड्या याला ५ लाख रुपये मिळाले. त्याशिवाय इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द इयर, गेमचेंजर ऑफ द इयर, पॉवरप्लेअर ऑफ द इयर आणि मॅक्सिम सिक्स अॅवार्ड्सही अंतिम सादरीकरण सोहळ्यात देण्यात आले. म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मालामाल करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -