Nawab Malik : जमीन हडपण्याच्या कटात नवाब मलिकांचा सहभाग

Share

मुंबई : मुंबईतील कुर्ल्यातील मुनिरा प्लंबर आणि तिची आई मरिअम गोवावाला यांची जमीन हडप करण्याबाबत हसीना पारकर, सलीम पटेल व आरोपी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कट केला होता, असे दाखवणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपल्या जामीन निर्णयात नोंदवले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असणारे माजी कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने ३० नोव्हेंबरला फेटाळला आहे. या निर्णयाचे पत्रक मंगळवारी उपलब्ध झाले. न्यायालयीन कोठडीत असलेले मलिक हे सध्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

दाऊदच्या ‘डी गँग’ मधील सदस्यांसोबत नवाब मलिक यांनी एकमत करून गोवावाला कंपाऊंड ही जमीन हडप केली आहे अशा आरोपाखाली ईडीने मलिक यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना २३ फेब्रुवारीला अटक केली आहे.

‘ईडीने पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अन्वये साक्षीदारांचे जबाब व तपासाच्या दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सर्व आजही मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची कंपनी सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. ही मालमत्ता घेण्याबाबत सलीम पटेल याच्यांसोबत अर्जदाराचे व्यवहार व एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन ईडीकडून पीएमएलए कायद्यातील तरतुदी लावणे उचित आहे’, असे निरीक्षणही न्या. रोकडे यांनी आपल्या ४३ पानी निकालामध्ये नोंदवले आहे.

Tags: nawab malik

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

4 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

5 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

6 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

6 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

6 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

6 hours ago