राज्यात वाघांची आकडेवारी दुप्पट वाढण्याचे संकेत

Share

अमरावती (हिं.स.) : गेल्या तीन वर्षांनंतर राज्यात वाघांची ऑनलाईन प्रगणना झाली. सोमवारी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना आटोपली आहे. त्यामुळे राज्यात वाघांची अचूक आकडेवारी पुढे येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार वाघांची संख्या दुप्पट झाल्याचे शुभसंकेत मिळत आहेत.

डेहराडून येथील वन्यजीव संस्थेच्या निर्देशानुसार, देशात एकाच वेळी वाघांची ऑनलाईन प्रगणना करण्यात आली. त्याकरिता वाईल्ड लाईफ संस्थेने एक ॲप विकसित करून दिले होते. सात दिवसांत वाघांसह अन्य वन्यजीवांच्या प्रगणनेची नोंद करण्यात आली आहे. ही प्रगणना क्षेत्रीय स्तरावर करण्यात आल्याने वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.

राज्याच्या पाचशे वनपरिक्षेत्रात सात दिवस सतत ही मोहीम राबविण्यात आली. प्रगणनेचा ऑनलाईन डेटा डेहराडून येथे पाठविण्यात आला आहे. वाघांची रीतसर माहिती समोर आल्यानंतर वन्यजीव विभागाचे प्रमुख ती माहिती जाहीर करतील. मात्र, राज्यात वाघांची आकडेवारी पाचशेच्या वर जाण्याचे संकेत आहेत.

ताडोबा-टिपेश्वर नंबर १

वाघांच्या संख्येसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प नंबर १ वर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य देखील वाघांच्या बाबतीत सरस ठरत आहे. कारण टिपेश्वर येथे नवतरुण वाघांची संख्या ३५ च्या आसपास गेल्याची माहिती आहे.

चंद्रपूर- ताडोबा- टिपेश्वर हा वाघांचा कॅरिडॉर झाला आहे. चंद्रपूरचे वाघ टिपेश्वरपर्यंत प्रवास करीत आहेत. ताडोबात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातसुद्धा वाघांची संख्या १५ टक्क्यांनी वाढण्याचे संकेत आहेत. पेंच, सह्याद्रीत वाघांची संख्या ५ टक्के वाढणार आहे.

दरम्यान, विदर्भात वाघांची संख्या ४०० च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ताडोबा, टिपेश्वर, नागझिरा, नवेगाव बांध, यवतमाळ, वणी, वरोरा, उमरेड, करांडला, बुलडाणा, किनवट या भागात वाघांची संख्या २ ते १० इतकी आहे. या भागात चंद्रपूर, ताडोबा येथून वाघ येत असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला गेला आहे.

प्रगणना आटोपली असली तरी अद्यापही अहवाल मिळाला नाही. अहवाल आल्यानंतर वन्यजीवनिहाय वर्गवारी केली जाणार आहे. त्यानंतर वाघ, बिबट आणि इतर वन्यप्राण्यांची संख्या निश्चित होईल. राज्याचे पर्यावरणीय वातावरण बघता वाघांची संख्या वाढेल, यात दुमत नाही. – सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र

Recent Posts

१००१ दिवसांच्या गुंतवणुकीवर ९टक्के व्याज, ही बँक देत आहे FDवर बेस्ट ऑफर

मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक…

1 hour ago

Success Mantra: कठीण परिस्थितींमध्येही असे राहा शांत आणि सकारात्मक

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. अनेकदा लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न…

2 hours ago

Lost Phone Track: या ट्रिकने सहज शोधू शकता हरवलेला फोन

मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली…

4 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, दि. ०६ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी…

6 hours ago

राणेंच्या झंझावाताने उबाठा सेनेला कापरे…

कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…

9 hours ago

नारायण राणे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत!

अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…

9 hours ago