Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाभारताची पुन्हा ‘कसोटी’

भारताची पुन्हा ‘कसोटी’

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका आजपासून; गंभीरसह श्रेयस, ऋतुराज केंद्रस्थानी

पार्ल (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला बुधवारपासून (१९ जानेवारी) सुरुवात होत आहे. कसोटी मालिकेतील १-२ असा पराभव पाहावा लागलेल्या पाहुण्या संघाची खेळ उंचावण्यादृष्टीने पुन्हा ‘कसोटी’ लागेल.

सेंच्युरियनमधील पहिला कसोटी सामना जिंकून भारताने आघाडी घेतली. मात्र, यजमानांनी उर्वरित दोन सामन्यांत खेळ उंचावताना बाजी पलटवली. मायदेशात सातत्य राखल्याने दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा त्यांना वनडे मालिकेत होईल.

उभय संघ आजवर ८४ वनडे सामने खेळले आहेत. यातील ३५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. याआधी, २०१८मधील दौऱ्यात भारताने सहा सामन्यांची वनडे मालिका ५-१ अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध ४६ सामने जिंकताना आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांतील नऊ सामन्यांचा निकाल लागला नाही. गेल्या पाच सामन्यांची आकडेवारी पाहिल्यास भारताने ३-१ अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांमधील शेवटची लढत पावसामुळे रद्द झाली. मार्च २०२०मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या पाहुण्यांचा मालिकेतील पहिला सामना होता.

भारताच्या वनडे संघाची भिस्त हंगामी कर्णधार लोकेश राहुलसह पुनरागमन केलेला सलामीवीर शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर तसेच उपकर्णधार जसप्रीत बुमरासह युझवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार यांच्यावर आहे.

टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेची भिस्त केशव महाराजसह क्विंटन डी कॉक, आयडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुन्गी एन्गिडी, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रॉसी वॅन डर ड्युसेनवर आहे.

भारताचा संघ : लोकेश राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक),युझवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बवुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, जुबेन हम्झा, मार्को जेन्सन, जानीमन मलान, सिसांदा मॅगाला, आयडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुन्गी एन्गिडी, वेन पार्नेल, अँडिले फेहलुवाक्वायो, ड्वायेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रॉसी वॅन डर ड्युसेन, काइल व्हेरिनी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -