Monday, May 20, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023 : भारत पाकिस्तान सामना आज झाला नाही तर भारताची...

Asia Cup 2023 : भारत पाकिस्तान सामना आज झाला नाही तर भारताची अवस्था होणार वाईट…

सुपर फोरसाठी भारताला काय करावं लागेल?

कोलंबो : कोलंबो येथे काल भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील आशिया कपचा (Asia Cup 2023) सामना उत्तम रंगत आणत होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असली तरी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवत भारतीय संघाने जोरदार फलंदाजी केली. मात्र २४ व्या षटकातच पावसाने मोडता घातला आणि सामना थांबवावा लागला. हा सामना आज दुपारी ३ वाजता खेळवला जाणार होता. मात्र, तोपर्यंत पाऊस थांबला नाही. आता हळूहळू सूर्यनारायणाचे दर्शन मिळाल्याने ५ वाजता सामना खेळवण्याचे ठरले आहे. मात्र, आता त्यात काही व्यत्यय आले आणि सामना होऊ शकला नाही तर ते भारतीय संघाला चांगलंच महागात पडणार आहे.

पाकिस्तान संघाने सुपर ४ मधील पहिला सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाने भारताविरुद्धचा हा सामना जिंकल्यास त्याचे चार गुण होतील आणि अंतिम फेरीतील त्याचे स्थान जवळपास निश्चित होईल. त्याचप्रमाणे भारताने हा सामना जिंकल्यास भारताचे दोन गुण होतील आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा त्याचा दावा बळकट होईल. मात्र, सामना रद्द झाला तर परिस्थिती वेगळी असेल जी भारतासाठी धोकादायक मात्र पाकिस्तानसाठी फायदेशीर आहे.

सुपर ४ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. त्यामुळे पाकिस्तान संघाकडे तीन गुण होतील. तर भारताचा हा पहिलाच सामना असल्यामुळे फक्त एक गुण असेल. भारताला १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि १४ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. पावसाने सामना वाया गेल्यास टीम इंडियाला एक गुण मिळेल आणि अशा परिस्थितीत त्याचा मार्ग कठीण होईल. या स्थितीत त्यांना त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील, कारण श्रीलंकेने यापूर्वीच एक सामना जिंकला आहे. जर संघ हरला तर त्याचे पुढील दोन सुपर फोर सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -