Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा

नवी दिल्ली (हिं.स.) : आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी १८ सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली.

कर्णधार पदाची जबाबदारी गोलरक्षक सविता पुनियाकडे सोपवण्यात आली असून बचावपटू दिप ग्रेस एक्काकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, भारताची तारांकित आघाडीपटू राणी रामपालला संघात स्थान देण्यात आले नाही.

भारतीय महिला हॉकी संघ :

गोलररक्षक : सविता पुनिया (कर्णधार),
बचावपटू   : दिप ग्रेस एक्का (उपकर्णधार), रजनी एतिमार्पू; गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता;
मध्यरक्षक : निशा, सुशीला चानू पुखरम्बाम, मोनिका, नेहा, ज्योती, नवजोत कौर, सलिमा टेटे;
आघाडीपटू : वंदना कटारिया, लालरेम्सियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी, संगीता कुमारी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -