Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाT-20 World Cup : टी-२० विश्वचषक स्पर्धेत षटकार मारण्यात भारतीय संघ अव्वल

T-20 World Cup : टी-२० विश्वचषक स्पर्धेत षटकार मारण्यात भारतीय संघ अव्वल

इंग्लंडचा संघ सातव्या स्थानी

मेलबर्न (वृत्तसंस्था) : नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाला असला तरी, षटकारांमध्ये रोहित कोहलीचा संघ अव्वल ठरला आहे. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी ३७ षटकार मारले आहेत.

या यादीत श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या नावावर ३० षटकारांची नोंद आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अनुक्रमे २८ आणि २५ षटकार मारले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ पाचव्या, दक्षिण आफ्रिकेचा संघ सातव्या आणि इंग्लंडचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.

टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेट्सने धुव्वा उडवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. यापूर्वी २०१०च्या विश्वचषकात इंग्लंडने टी-२० विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडने भारताविरुद्ध एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली होती. पण या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा मान भारतीय संघाने मिळवला आहे. तर, चॅम्पियन ठरलेला इंग्लंडचा संघ या यादीत तळाशी आहे. इंग्लंडने स्पर्धेत केवळ २२ षटकार मारले असून तो सातव्या स्थानी आहे.

महत्वाच्या बातम्या…

T-20 : टी-२० इलेव्हनमध्ये विराट, सूर्या

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -