Sunday, May 19, 2024
HomeदेशIndian railway: १०५ वर्षात पहिल्यांदा महिला बनल्या रेल्वे चेअरमन, कोण आहेत जया...

Indian railway: १०५ वर्षात पहिल्यांदा महिला बनल्या रेल्वे चेअरमन, कोण आहेत जया वर्मा सिन्हा?

नवी दिल्ली : १०५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या महिलेकडे रेल्वेचे अध्यक्ष (railway board president) तसेच सीईओपद आले आहे. गुरूवारी जया वर्मा सिन्हाला (jaya verma sinha) भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि सीईओ बनवण्यात आले. जया वर्मा सिन्हा १ सप्टेंबर २०२३ ला कार्यभार हाती घेतील. सिन्हा सध्याच्या वेळेस रेल्वे बोर्डाच्या सदस्य म्हणून काम करत आहे आणि त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये कमीत कमी ३५ वर्षे सेवा केली आहे.

जया वर्मा सिन्हा प्रतिष्ठित इलाहाबाद युनिर्व्हसिटीच्या माजी विद्यार्थी आहेत. त्या १९८६मध्ये रेल्वेमध्ये कामास रुजू झाल्या. सिन्हा बोर्डाचे प्रमुख अनिल कुमार लाहोटी यांचे स्थान घेतील. विजयलक्ष्मी विश्ननाथन रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या मात्र जया रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील.

भारतीय रेल्वेला केंद्रीय बजेट २०२३-२४मध्ये २.४ लाख कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरला मिळालेले आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज आहे.

जया वर्मा सिन्हा ओडिसाच्य बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताच्या वेळेस खूप कार्यरत होत्या. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमावर नजर ठेवली होती. याशिवाय त्यांनी पीएमओला या घटनेबाबत पॉवर प्रेझेंटेशनही दिले होते. त्यांची सक्रियता आणि कार्यशैलीचे चांगले कौतुक झाले होते. आता सरकारनेही जया वर्मा सिन्हा यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -