Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीमनमाड प्रकल्पावर इंडियन ऑइलच्या पाईपलाईनला गळती

मनमाड प्रकल्पावर इंडियन ऑइलच्या पाईपलाईनला गळती

दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित, जिल्ह्यात इंधन तुटवडा भासण्याची शक्यता

मनमाड : मनमाड नांदगाव रोडवरील नागापूर जवळ असलेल्या इंडियन ऑइल कंपनीतील इंधन पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात इंधन गळती होत असून पहाटेच्या सुमारास प्रकल्पातील प्रेशर रिलीज न झाल्याने येणाऱ्या इंधनाच्या अति दाबाने पाईपलाईनला गळती सुरू झाल्याने लांबपर्यंत इंधनाचे फवारे उडत असताना प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही.

मात्र मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाल्याने जिल्ह्यासह ग्रामीण भागातील इंधन पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रान्सपोर्ट व डीलर यांच्या टँकर्स भरण्याकरिता अकोलनेर, कीव इतर कंपन्यांचा सहारा घेत जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले असून, सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने कंपनी प्रशासनाकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. दोन ते तीन दिवसात पाईपलाईन दुरुस्त करून प्रकल्पातील इंधन पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

मात्र या सगळ्या घटनांमुळे सकाळपासूनच इंडियन ऑइल प्रकल्पातील वाहतूक ठप्प झाल्याने जिल्ह्यासह मराठवाड्यातील इंधन पंपावर तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता असून तुटवड्यामुळे वाहनधारकांना इंधन उणीव भासेल. नागापूर ग्रामस्थांनी मनमाड पोलीस स्थानकात निवेदन देऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून स्थानिक पोलीस व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनेची चौकशी करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -