Sunday, May 19, 2024
Homeदेशजगात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच तिसऱ्या क्रमाकांवर

जगात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच तिसऱ्या क्रमाकांवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

पणजी : ‘देशात दुचाकी व चारचाकींची विक्री वाढत असून विक्रम तोडले जात आहेत. इलेक्ट्रिकल वाहनांची मागणी वाढत आहे. ऊर्जा सुरक्षा सप्ताहानिमित्त येथे आम्ही भेटतोय, पर्यावरणीय संवेदनशीलता व स्वयंपोषक भवितव्य याबाबत चर्चा करतोय, ही अत्यंत चांगली बाब आहे. ऊर्जा क्षेत्रात आपला देश अधिक शक्तिशाली होत चालला आहे. २०४५ पर्यंत देशात ऊर्जा वापर दुपटीने वाढेल. लवकरच भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा ठाम दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘विकसित भारत, विकसित गोवा २०४७’ कार्यक्रमांतर्गत १३३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. मोदी यांनी रोजगार मेळ्यांतर्गत विविध विभागांमधील १९३० नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशही वितरित केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पातील साधन सुविधांसाठीचा अधिकाधिक निधी वीज क्षेत्रासाठी खर्च केला जाईल. घरगुती गॅस वापर वाढला आहे. ऊर्जा क्षेत्रात सातत्याने क्षमता वाढवली जात आहे. २०४५ पर्यंत भारताची प्राथमिक ऊर्जा दुपटीने वाढेल. गोवा विकासाच्या बाबतीत बरीच प्रगती करीत आहे. गोवेकरांचे आदरातिथ्य सर्वांसाठीच भारावून सोडणारे आहे. देशात दुचाकी व चारचाकींची विक्री वाढत असून विक्रम तोडले जात आहेत. इलेक्ट्रिकल वाहनांची मागणी वाढत आहे. ऊर्जा सुरक्षा सप्ताहानिमित्त येथे आम्ही भेटतोय, पर्यावरणीय संवेदनशीलता व स्वयंपोषक भवितव्य याबाबत चर्चा करतोय, ही अत्यंत चांगली बाब आहे. ऊर्जा क्षेत्रात आपला देश अधिक शक्तिशाली होत चालला आहे. घरगुती गॅस वापर वाढला आहे. ऊर्जा क्षेत्रात सातत्याने क्षमता वाढवली जात आहे. २०४५ पर्यंत भारताची प्राथमिक ऊर्जा दुपटीने वाढेल. गोवा विकासाच्या बाबतीत बरीच प्रगती करीत आहे. गोवेकरांचे आदरातिथ्य सर्वांसाठीच भारावून सोडणारे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी गोवेकरांची प्रशंसा केली.

या प्रसंगी मोदींहस्ते ओएनजीसीच्या ‘सी सर्व्हायव्हल सेंटर’चे उद्घाटनही झाले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘गोव्यात २०२७ पर्यंत शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाईल. २०३५ पर्यंत ६० टक्के सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीची आमचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन

कुंकळ्ळी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दोनापॉल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, बेती येथील आयएनएस मांडवी नेव्हल वॉर कॉलेजचे नवीन कॅम्पस आणि कुडचडे येथील एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधा या चार प्रकल्पांचे उद्घाटन तसेच रेइश मागुश येथी पीपीपी तत्वावर येऊ घातलेला ‘रोप वे प्रकल्प’, पाटो-पणजी येथील थ्री डी-प्रिंटेड इमारत आणि शेळपें, साळावली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी रिमोट कंट्रोल द्वारे बटन दाबून वर्चुअल पद्धतीने केली. सभेच्या स्थळी ७० हजार लोक उपस्थित असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -