Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीpopulation : भारतात अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी बँक खाती सुरू केली

population : भारतात अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी बँक खाती सुरू केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

बाली (वृत्तसंस्था) : अमेरिकेची जेवढी लोकसंख्या (population) आहे, तेवढी भारतात २०१४ नंतर बँक खाती सुरू केली आहेत. शिवाय जवळपास ३ कोटी गरीबांसाठी मोफत घरे बांधून दिली. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक नागरिकाला घर मिळेल एवढी घरे बांधली आहेत. घर मिळाल्यानंतर व्यक्ती रातोरात लखपती होतो. गेल्या सात-आठ वर्षांत ५५ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवले, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. इंडोनेशिया येथे होणाऱ्या १७व्या जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. त्यासाठी सध्या ते इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी इंडोनेशियातील बाली येथे भारतीय जनसमुदायाला संबोधित केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ नंतर भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. कोरोना काळात देखील भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले. याबरोबरच अनेक देशांना लसीचा पुरवठा देखील केला. डिजिटलायझेशनमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. याबरोबरच, आयटीसह अनेक रोगांवरील लसी तयार करण्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. २०१४ नंतरच्या आणि आधीच्या भारतात खूप मोठा फरक आहे. आज भारत प्रचंड वेगाने विकास करत आहे.

SEA-VIGIL : सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचे “सी व्हिजील”

भारत सरकार आयुषमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचा रुग्णाचा खर्च उचलत आहे. आजचा भारत विकसीत भारत बनण्याचे स्वप्न पाहात आहे. परंतु, भारताचे हे लक्ष्य फक्त भारताचा एकट्याचा विकास नाही, तर भारत या संपूर्ण विश्वाचा विकास करण्यासाठी आपला विकास करत आहे. आज भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. वातावरणीय बदलांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताने जगाला मिशन लाईफचा मंत्र दिला आहे. पर्यावरणाला अनुकूल असलेले जीवनमान जगण्याचा भारताचा मंत्र आहे. भारताचा योग, आयुर्वेद संपूर्ण मानव जातीसाठी बक्षिस आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत आणि इंडोनेशियाच्या संबंधांबाबत नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, “भारत आणि इंडोनेशिया खांद्याला खांदा लावून विकासकामे करत आहेत. दोन्ही देशांचे नाते खूप खास आहे. अनेक भारतीय देखील इंडोनेशियाच्या विकासात योगदान देत आहेत. येथील विविध क्षेत्रात भारतीय नागरिक कार्यरत आहेत. सींधी, गुजराती, तामीळ यांच्यासह अनेक समुहाचे लोक येथे राहात आहेत. बालीमध्ये महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार देखील केला जातोय याचा मला अभिमान आहे.

‘२०३० पर्यंत ५० टक्के वीजनिर्मिती अक्षय उर्जास्त्रोतांपासून’

इंडोनेशियातील बाली येथील ‘जी-२०’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. अमेरिका, फ्रांन्स यांसारख्या देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान यांनीदेखील या परिषदेस हजेरी लावली आहे. दरम्यान, भारत देश २०३० सालापर्यंत ५० टक्के वीजनिर्मिती ही अक्षय उर्जास्त्रोतांपासून करेल, असे यावेळी परिषदेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारत देश आगामी २०३० सालापर्यंत ५० टक्के उर्जा ही अक्षय उर्जास्त्रोपांपासून निर्माण करेल. त्यासाठी विकसनशील देशांना शास्वत तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, किफायतशीर वित्तपुरवठा आदी बाबी गरजेच्या आहेत,” असे मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाच्या संदर्भानेदेखील भाष्य केले आहे. जगाला युद्धबंदी आणि मुत्सद्देगीरीचा मार्ग पुन्हा एकदा शोधावा लागेल. “याआधी दुसऱ्या महायुद्धामुळे जगात हाहा:कार माजला होता. या महायुद्धानंतर तत्कालीन नेत्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला. आता आपण हा मार्ग स्वीकारण्याची वेळ आहे, असे मोदी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -