Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIND Vs SA: दुसऱ्या कसोटीत बदलणार टीम इंडियाचे प्लेईंग ११, २-३ खेळाडूंची...

IND Vs SA: दुसऱ्या कसोटीत बदलणार टीम इंडियाचे प्लेईंग ११, २-३ खेळाडूंची सुट्टी निश्चित

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेईंग ११मध्ये बदल होणार आहे. भारताच्या प्लेईंग ११मध्ये बदल होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे पहिल्या कसोटीत आफ्रिकेकडून एक डाव आणि ३२ धावांनी झालेला पराभव.यामुळे ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी आवेश खानला संघात सामील करण्यात आले आहे. दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियामध्ये तीन बदल पाहायला मिळू शकतात.

ऑलराऊंडर रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीत खेळणे निश्चित आहे. फिट नसल्याने जडेजाला पहिल्या कसोटीत प्लेईंग ११मध्ये जागा मिळाली नव्हती. मात्र तो आता प्लेईंग ११मध्ये आर अश्विनला रिप्लेस करणार आहे. आर अश्विन पहिल्या कसोटीत फलंदाज आणि गोलंदाजीत कमाल दाखवू शकला नव्हता. अश्विनने पहिल्या डावात ८ धावा केल्या तर दुसऱ्या डावात पहिल्या बॉलवरच खाते न खोलता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अश्विनने १९ षटके गोलंदाजी करताना केवळ १ विकेट मिळवला होता.

प्रसिद्ध कृष्णाला पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली होती. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने कृष्णाला दिलेली संधी यशस्वी टरली नाही. कृष्णाला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खूप झोडले. कृष्णाने २० षटकांत गोलंदाजीत ९३ धावा दिल्या आणि केवळ एक विकेट मिळवली. एवढा महागडा ठरल्यानंतर कृ्ष्णाला आता प्लेईंग ११मध्ये जागा दिली जाणार नाही. कृष्णाच्या स्थानावर आवेश खानला संधी मिळू शकते.

अय्यर आणि गिलची जागा कायम

पहिल्या कसोटीत फलंदाजीतील खराब कामगिरीनंतर अय्यर आणि गिल निशाण्यावर आहेत. गिल आतापर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. १९ कसोटी खेळल्यानंतर गिलची फलंदाजीची सरासरी ३१ आहे जी सगळ्यात खराब आहे. याशिवाय टीम मॅनेजमेंट गिलवर विश्वास कायम ठेवणार आहे. दुसऱ्या कसोटीत तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करताना दिसेल.

अय्यर शॉर्ट गोलंदाजीविरुद्ध खराब परफॉर्मन्समुळे निशाण्यावर असतो. पहिल्या कसोटीत अय्यरने ३१ धावांची खेळी करत क्रीजवर टिकण्याचा प्रयत्न केला. अशातच टीम मॅनेजमेंट त्याला आणखी एक संधी देऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -