Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIND vs ENG: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, इंग्लंडला ४३४ धावांनी हरवले

IND vs ENG: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, इंग्लंडला ४३४ धावांनी हरवले

राजकोट: भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात इतिहास रचला आहे. टीम इंडियाने कसोटी इतिहासात मोठ्या धावांनी विजय मिळवला आहे. राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला ४३४ धावांनी हरवले. भारतासाठी यशस्वी जायसवालने दुहेरी शतक ठोकले. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने शतक ठोकले. जडेजाने बॉलिंगमध्येही कामाल केली. टीम इंडिया या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडीवर आहे.

टीम इंडियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. या दरम्यान कर्णधार रोहितने १९६ चेंडूचा सामना करताना १३१ धावा केल्या त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले.रवींद्र जडेजाने २२५ चेंडूंचा सामना करताना ११२ धावा केल्या त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावले. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सर्फराज खानने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ६६ बॉलमध्ये ६२ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ४६ धावांचे योगदान दिले.

यशस्वीचे शानदार दुहेरी शतक

भारतान ४३० धावा करत दुसरा डाव घोषित केला. या दरम्यान, यशस्वी जायसवालने दुहेरी शतक ठोकले. त्याने २३६ बॉलचा सामना करताना २१४ धावा केल्या. यशस्वीने या डावात १४ चौकार आणि १२ षटकार ठोकले. शुभमन गिलनेही चांगली कामगिरी केली. त्याने १५१ बॉलमध्ये ९१ धावा केल्या. सर्फराज या डावातही कमाल खेळला. त्याने ७२ चेंडूचा सामना करताना नाबाद ६८ धावा केल्या. सर्फराजने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले.

चांगल्या सुरूवातीनंतर तोंडावर पडली स्टोक्सची टीम

इंग्लंडने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. त्यानी ३१९ धावा केल्या, मात्र दुसऱ्या डावात त्यांचा डाव पत्त्यासारखा कोसळला. इंग्लंडसाठी बेन डकेटने पहिल्या डावात शतक ठोकले. त्याने १५१ बॉलमध्ये १५३ धावा केल्या. या दरम्यान त्याने २३ चौकार आणि २ षटकार लगावले. बेन स्टोक्सने ८९ चेंडूत ४१ धावा केल्या. ओली पोपने ३९ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. इंग्लंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात १२२ धावांवर ऑलआऊट झाला.

इंग्लंडच्या पहिल्या डावात सिराजने ४ विकेट मिळवल्या. त्याने २१.१ षटकात ८४ धावा देत ४ बळी मिळवले. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने २-२ विकेट मिळवल्या. बुमराह आणि अश्विनला एक विकेट मिळवता आली. दुसऱ्या डावात जडेजाने कमाल केली. त्याने ५ विकेट मिळवल्या. जडेजाने १२.४ षटकांत ४१ धावा दिल्या. कुलदीप यादवला २ विकेट मिळाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -