Sunday, May 12, 2024
Homeक्रीडाIND vs ENG: दोघांच्या पदार्पणासह चार बदल निश्चित, दुसऱ्या कसोटीत अशी सेट...

IND vs ENG: दोघांच्या पदार्पणासह चार बदल निश्चित, दुसऱ्या कसोटीत अशी सेट होऊ शकते भारताची प्लेईंग ११

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ पहिला सामना गमावल्यानंतर या मालिकेत ०-१ने पिछाडीवर आहेत. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका १-१ बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सामना जिंकम्यासाठी टीम इंडियाला बेस्ट प्लेईंग इलेव्हनची गरज पडेल.

रजत पाटीदार आणि सरफराज खान यांचे पदार्पण निश्चित

रिप्लेसमेंट म्हणून दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात रजत पाटीदार आणि सरफराज खान यांचे पदार्पण निश्चित आहे. पाटीदार तिसऱ्या स्थानावर शुभमन गिलला रिप्लेस करू शकतो. गिल काही काळापासून कसोटीत खराब फॉर्मशी लढत आहे. तर हैदराबादमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत चौथ्या स्थानावर खेळणाऱ्या राहुलच्या अनुपस्थितीत सरफराज खानला त्याच स्थानावर संधी मिळू शकते.

पहिल्या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत मैदानात उतरला होता. माज्ञ सिराजला काही खास कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या सामन्यात पिचने स्पिनर्सला खूप मदत केली होती. अशातच रोहित शर्मा चार स्पिनर्सचा पर्याय निवडू शकतो.

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारताचे संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, रजत पाटीदार, सफराज़ खान, श्रेयस अय्यर, केएस भरत, वाशिंगटन सुंदर, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -