Friday, May 17, 2024
Homeक्रीडाIND vs ENG: इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी केली प्लेईंग ११ची घोषणा

IND vs ENG: इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी केली प्लेईंग ११ची घोषणा

मुंबई: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतात इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची सुरूवात उद्यापासून म्हणजेच २५ जानेवारीपासून होत आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाटी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या प्लेईंग ११मध्ये वरिष्ठ वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला सामील करण्यात आलेले नाही आहे. तर पिच पाहता बेन स्टोक्सने अंतिम ११मध्ये दोन स्पिनर्सना सामील केले आहे. याशिवाय हॅरी ब्रूकच्या जागी बेन फोक्सला संधी मिळाली आहे.

इंग्लंडच्या प्लेईंग ११ बद्दल बोलायचे झाल्यास जॅक क्रॉली आणि बेन डकेट डावाची सुरूवात करतील. यानंतर ओली पोप आणि अनुभवी फलंदाज ज्यो रूट खेळताना दिसेल. पाचव्या स्थानावर जॉनी बेअरस्ट्रॉ खेळेल. दरम्यान त्याच्यावर विकेटकीपिंगची जबाबदारी नसेल. अशातच तो फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. नंतर कर्णधार बेन स्टोक्स खेळेल. स्टोक्स संपूर्ण मालिकेत सहाव्या स्थानावर खेळताना दिसेल. यानंतर विकेटकीपर बेन फोक्स खेळले. अशा पद्धतीने इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटीत सात फलंदाजांसह उतरणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेईंग ११ – जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, ज्यो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, बेन स्टोक्स(कर्णधार), बेन फोक्स(विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, जॅक लीच आणि मार्क वूड.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -