साथीच्या आजारांचा धोका वाढला!

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका असतानाच कावीळ, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. २६ दिवसांत साथीच्या आजारांमध्ये दुप्पट वाढ झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढल्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पावसाळ्यानंतरही हे आजार वाढत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

१ ते २६ डिसेंबरपर्यंत मलेरियाचे २३५, गॅस्ट्रोचे ३४९, डेंग्यूचे ३७, कावीळचे ३०, चिकनगुनियाचे १०, लेप्टोचे ४ रुग्ण आढळले आहेत. तर एच १ एन १ रुग्ण आटोक्यात असून गेल्या १९ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही. तर वर्षभरात लेप्टोमुळे ४ तर डेंग्यूची लागण होऊन ३ जण दगावल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

एकीकडे कोरोना आणि उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे तर दुसरीकडे साथीचे आजार रोखण्याचे आव्हान पालिकेसोर आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

१ ते २६ डिसेंबरपर्यंतचे रुग्ण

मलेरिया – २३५
गॅस्ट्रो – ३४९
डेंग्यू – ३७
कावीळ – ३०
चिकनगुनिया – १०
लेप्टो – ४

Recent Posts

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

4 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

4 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

4 hours ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

4 hours ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

4 hours ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

4 hours ago