Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकोकणच्या लाल मातीत पिकतेय लालबूंद, रसरशीत स्ट्रॉबेरी

कोकणच्या लाल मातीत पिकतेय लालबूंद, रसरशीत स्ट्रॉबेरी

सिंधुदुर्ग: कोकणात तुम्ही भात पिकताना पाहिलं असेल. काजू, कोकम, आंबे म्हणजे कोकणचं वैभव पण पण कोकणात स्ट्रॉबेरी शेती शक्य आहे का? तर याचं उत्तर हो आहे.

लालबुंद, रसरशीत स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला आठवत ते महाबळेश्वर. गेल्या तीन वर्षांपासून तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी घारपी गावात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जांत आहे. या शेतकऱ्याने तळकोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

जोश कर्णाई असं या शेतकऱ्याचं नवा. मूळचे केरळचे असलेले कर्णाई हे कामानिमित्त मुंबईत आले होते. मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी तळकोकणात शेती घेतली. या शेतीत ते अनेक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यात त्यांनी सध्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं आहे.

जोश कर्णाई हे अर्धा एकर जागेवर गेली तीन वर्ष स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत. दिवसाआड त्यांना २५ किलो उत्पन्न मिळतं. सुरुवातीला त्यांना ७०० रुपये प्रति किलो दर मिळाला. सध्या हा दर २५० रुपये आहे. स्थानिक सावंतवाडी बाजारपेठेसह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीला मागणी आहे.

कोकणातील उष्ण आणि दमट वातावरणात स्ट्रॉबेरीची शेती शक्य झाली आहे कारण, घारपी गावातील वातावरण स्ट्रॉबेरी शेतीसाठी पूरक आहे. हनुमंत गडाच्या अगदी पायथ्याशी स्ट्रॉबेरीची ही शेती असल्याने पर्यटक देखील या स्ट्रॉबेरीच्या शेतीला भेट देत स्ट्रॉबेरीची चव चाखतात.

या स्ट्रॉबेरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी शेती केली जाते. त्यामुळे या स्ट्रॉबेरीला चव देखील चांगली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीचं हे स्ट्रॉबेरीच उत्पादन घेतलं जात अल्याची माहिती शेतकरी जोश कर्णाई यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -