तर महाराष्ट्रातही पुन्हा शाळा, कॉलेज, लोकलबाबत निर्णय घेणार

Share

नागपूर : ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाल्यापासून देशातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने सरकारने कठोर पाऊले उचलण्याचा विचार सुरु केला आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्लीमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही निर्बंध लावले जाऊ शकतात, असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली तर तीच स्थिती इथे निर्माण होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाही झाली आहे. ते निर्बंधाबाबत निर्णय घेतील. यात एक पर्याय म्हणजे राज्यात काही ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करुन तिथे प्रवेश बंदी केली जाईल. गर्दी होणार नाही त्याची दक्षता घेण्यात येईल. रेल्वेत जी गर्दी होतेय त्यावरही मुख्यमंत्री गंभीर आहेत. कॅबिनेट आणि टास्कफोर्सच्या बैठकीत यावर चर्चा होईल. निर्णय होणे अपेक्षित आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोनाची तिसरी लाट राज्यात धडकली आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या १० हजारांवर पोहचली आहे. मुलांचे लसीकरण लवकर व्हावं यासाठी प्रशासन सज्ज आहे. कुठलाही विद्यार्थी लसीकरणातून सुटणार नाही अशी मोहिम हाती घेतली आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय शॉपिंग मॉल, मार्केट, रेस्टॉरंट, बार यावरही निर्बंध आखले आहेत. स्पा, सलून, ब्यूटी पार्लर, स्विमिंग पूल, प्राणीसंग्रहालय, मनोरंजन पार्क बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. सरकारी व खासगी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. सर्व प्रशासकीय बैठका व्हर्चुअल माध्यमातून घेतल्या जातील. संध्याकाळी ७ नंतर लोकल सेवा बंद राहील. तर ७ च्या आधी लोकलमध्ये केवळ ५० टक्के प्रवाशांना प्रवासास परवानगी दिली आहे.

Recent Posts

काव्यरंग

सुजाण पालकत्व पालक सुजाण बालक अजाण सुजाण पालकत्वाची असावी प्रत्येकाला जाण वाईट सवयी संगतीचा करा…

5 mins ago

शब्दांची लाडीगोडी : कविता आणि काव्यकोडी

दादा आमचा बोलताना शब्दाला जोडतो शब्द त्या जोडशब्दातून मग भेटतो नवीन शब्द बडबडणाऱ्याला म्हणतो बोलू…

17 mins ago

निर्णय क्षमता

माेरपीस: पूजा काळे व्यक्तिसापेक्ष आचार, विचार, सुखदुःख यांच्या आलेखाचे चढउतार ठरलेले असतात. सर्वस्व घेऊन आलेली…

34 mins ago

ता­ऱ्यांची निर्मिती

कथा - प्रा. देवबा पाटील नेहमीप्रमाणे यशश्रीकडे परीताई आली. यशश्रीने चहा केला. दोघीही चहा घेऊ…

37 mins ago

मदत

कथा - रमेश तांबे सर्व मुलांच्या परीक्षा संपून निकालदेखील लागले होते. आता मे महिन्याची सुट्टी…

44 mins ago

पुस्तके : माणूसपणाची खूण

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर माणूस अनेक बाबतीत इतर प्राण्यांपेक्षा अनेक गोष्टींत वेगळा ठरतो. याविषयीचे कितीतरी…

47 mins ago