Thursday, May 16, 2024
Homeमहत्वाची बातमी‘बिल भरले नाही तर कारवाई होणारच’

‘बिल भरले नाही तर कारवाई होणारच’

ऊर्जामंत्र्यांनी नेत्यांनाच दिला इशारा

मुंबई : वीजेची थकबाकी भरण्यासाठी राज्याच्या ऊर्जा विभागाकडून सातत्याने सर्वसामान्यांना आवाहन करण्यात येत आहे. पण विभागाने दिलेल्या नव्या यादीनुसार, राज्यातील नेत्यांनीच करोडो रुपयांची वीज बिले थकवली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे नेत्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

हे सर्व नेते सुज्ञ आहेत आणि ते नक्कीच आपले थकीत वीज बिल भरतील असे वाटते. सर्वांसाठी नियम हा सारखा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर ज्याप्रमाणे नियमानुसार कारवाई होत असते, तशीच कारवाई इतरांवरही केली जाईल, त्यातून कोणीही वगळले जाणार नाही, असा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -