Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023ICC ODI Rankings 2023: बाबर आझमला मागे टाकत शुभमन गिल नंबर वन

ICC ODI Rankings 2023: बाबर आझमला मागे टाकत शुभमन गिल नंबर वन

मुंबई: जगातील नंबर वन फलंदाज बाबर आझमला(babar azam) मोठा धक्का बसला आहे. त्याने आपले अव्वल स्थान गमावले आहे. तर भारताचा सलामीवीर शुभमन गिलने(shubman gill) आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडून अव्वल स्थान खेचून घेतले आहे. गिल आपल्या छोट्याशा करिअरमध्ये पहिल्यांदा अव्वल स्थानी पोहोचला आहे.

मोहम्मद सिराजने वनडे गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. त्याने शाहीन शाह आफ्रिदीकडून नंबर वन पद खेचून घेतले. वर्ल्डकपमध्ये भारताच्या जबरदस्त कामगिरीमुळे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये टॉप १०च्या रँकिंगमध्ये मोठे बदल झाले आहेत.

गिलने वर्ल्डकपमध्ये भारताला अनेकदा शानदार सुरूवात करून दिली. तर दुसरीकडे बाबर आझम अपयशी ठरला. यामुळे गिलने बाबरला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर शुभमन गिल भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे ज्याने वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले.

गिलने गेल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध ९२ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ धावांची खेळी केली. त्याने स्पर्धेतील ६ डावांत एकूण २१९ धावा केल्या.

२ वर्षांनी बाबर आझमचे स्थान घसरले

बाबरने वर्ल्डकपमधील ८ डावांत एकूण २८२ धावा केल्या.तो आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तो दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ अव्वल स्थानावर होता.

विराट कोहली चौथ्या स्थानावर

वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -