शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाची घरे देणार – बावनकुळे

मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२७ वी बैठक मंत्रालयातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. महसूलराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शेती महामंडळाच्या १४ शेतमळ्यांवर २९६६ निवासस्थाने आहेत. यापैकी १७८६ निवासस्थाने राहण्यास अयोग्य ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे ही निवासस्थाने रिक्त करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीसाठी ठेवला होता. यावर चर्चा करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेती महामंडळाच्या सर्वच सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या माध्यमातून चांगली घरे उपलब्ध करुन देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. गिरणीकामगारांप्रमाणे या कामगारांनाही चांगली घरे मिळाली पाहिजेत अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. त्याला महसूलराज्यमंत्री योगेश कदम यांनीही दुजोरा दिला.

बैठकीत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाला उत्पन्न वाढविण्यासाठी ५०० कोटींचे उद्दिष्टही देण्यात आले आहे. महामंडळाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हजार एकर जागेवर विविध उपक्रम राबवून हे उत्पन्न वाढविण्याच्या सूचनाही महसूलमंत्र्यांनी केल्या. त्याबरोबरच शेती महामंडळाच्या कोणत्याही जागा मोफत वापरासाठी न देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

शेती महामंडळाच्या मळ्यावरील सेवानिवृत्त, राजीनामा, मयत कर्मचाऱ्यांना बोनस वाटपास मंजूरी देण्यात आली. तर महामंडळाच्या जमीनीवर संयुक्त शेती पद्धतीने पीक योजना राबविण्यासाठी वीज आणि सौरपंप कनेक्शन मिळण्याबाबत तसेच सोलर प्रकल्पासाठी ऊर्जा विभागाच्या प्रचलीत भाडेपट्ट्याने जागा देण्यासाठी बैठक आयोजित करण्याच्याही सूचनाही देण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोकमठाण येथील महामंडळाची जमीन वखार महामंडळास व्यवसायाकरीता देणे, अकृषिक जमीनी विना निविदा शासनाच्या संलग्न संस्थांना भाडेपट्टाने देणे, संयुक्त शेतीचे करारनामे करताना प्रथम वर्षी १५० टक्के वाढ आणि दरवर्षी १० टक्के ऐवजी ५ टक्के वाढ करणे, संयुक्त शेतीसाठी ब्लॉकचा कालावधी १ एप्रिलपासून सुरु करणे, १४ मळ्यांमधील शेतजमीन भूमी अभिलेख विभागाकडे मोजणी फी भरून मोजणी करुन घेणे, पुणे मुख्यालय येथील ५४ सदनिका यांचे वापरमुल्यांच दर सुधारित करणे, १ ते २ गुंठेच्या आतील शिल्लक क्षेत्र विक्री करण्यास मान्यता देणे, नाशिक जिल्ह्यातील काष्टी ता. मालेगाव येथील १२ हेक्टर १७ आर जागा राहूरी कृषी विद्यापिठास पैशांची आकारणी करुन मंजूरी देणे आदी विषय बैठकीत मंजूर करण्यात आले.

Black Tiger : दुर्मिळ काळे वाघ पाहायचेत; ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या!

मुंबई : आतापर्यंत अनेकांना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघांबद्दल माहिती आहे. हे वाघ अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र आता पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघासह काळ्या रंगाच्या वाघांची माहिती समोर आली आहे. ओडिशामधील ‘सिमिलिपाल’ उद्यानात ‘काळे वाघ’ पाहायला मिळणार आहेत. “काळा वाघ” हा शब्द ऐकला की अनेक लोकांच्या डोळ्यापुढे एक गूढ आणि दुर्मीळ प्राणी उभा राहतो. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

Sugercane Juice : उसाचा रस प्या अन् गारेगार राहा!

“काळा वाघ” हा प्रत्यक्षात सामान्य वाघ आहे. पण त्याच्या अंगावरचे पट्टे अधिक गडद आणि जवळपास असल्यामुळे तो पूर्ण काळा असल्याचे दिसून येत आहे. या वाघाला मेलॅनिस्टिक वाघ (Melanistic Tiger) असे म्हणतात. मूळात हे बंगाल टायगर आहेत, पण एका विशिष्ट जनुकांमध्ये बदल झाल्यामुळे त्यांच्या अंगावरील पट्टे जास्त काळे झाले आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यातील ‘सिमिलीपाल टायगर रिझर्व्ह’ या ठिकाणी काळसर-मेलॅनिस्टिक वाघांचे अस्तित्व प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे.

‘सिमिलीपाल’ला मिळाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा

२४ एप्रिल २०२५ रोजी ओडिशा सरकारने अधिकृत अधिसूचना जारी करून सिमिलिपालला भारतातील १०७वे आणि ओडिशातील दुसरे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आहे. हे उद्यान ८४५.७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असून, हे ओडिशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे. मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलिपाल दक्षिण आणि उत्तर वन विभागांतील ११ रेंजमध्ये हे उद्यान पसरले आहे.

‘मेलॅनिस्टिक’ म्हणजे काय?

‘मेलॅनिस्टिक’ हा शब्द मेलॅनिझम (Melanism) या संज्ञेपासून आला आहे. हे एक आनुवंशिक (genetic) स्थिती आहे. ज्यामध्ये प्राण्याच्या त्वचेमध्ये, केसांमध्ये किंवा फरामध्ये “मेलॅनिन” नावाच्या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तो प्राणी खूप गडद किंवा काळसर दिसतो.

ड्रग्ज डॉनच्या बापाची आत्महत्या! आत्महत्येच्या चिठ्ठीत धक्कादायक आरोप! नवी मुंबईत खळबळ

नवी मुंबई : भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या नवीन चिचकरचे वडील आणि नामांकित बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी आज सकाळी स्वतःच्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, मृतदेहाशेजारी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी थेट नार्को विभागाच्या अधिकाऱ्यांवर जाचाचा आरोप करत, त्यांच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख केला आहे.

गुरु चिचकर हे एका नामांकित बांधकाम व्यावसायिक कुटुंबातील असून त्यांचा मुलगा नवीन चिचकर हा सध्या देशाबाहेर फरार आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर असलेल्या नवीन चिचकरविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तो विदेशातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती आहे.

वक्फ कायद्यात बदल गरजेचाच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

घटनास्थळी पोलिसांनी एक सुसाईड नोट हस्तगत केली असून त्यातील मजकुरामुळे खळबळ माजली आहे. या चिठ्ठीत गुरु चिचकर यांनी मुलावर दाखल झालेल्या केसेसमध्ये नार्को अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे जीवन संपवावे लागल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, चिठ्ठीत आणखी कोणते खुलासे आहेत का, याची चौकशी सुरू असून नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

‘उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे’

मुंबई : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी बेस्टने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सहपालकमंत्री ॲड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर श्रीनिवास आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबईतील नागरिकांना प्रवास करताना जास्त ताटकळत थांबावे लागू यासाठी नियोजन करावे. बसची संख्या वाढविण्यासोबत बस किती वेळात येणार, सध्या कुठे आहे, याची माहिती प्रवाशांना होण्यासाठी यंत्रणेची त्वरित अंमलबजावणी करावी. बांद्रा, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. मुंबईतील छोटे, अरूंद रस्ते पाहता अत्याधुनिक छोट्या बस घ्याव्यात. यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या एन कॅपच्या (नॅशनल क्लिन एअर पॉलिसी) निधीचा वापर करावा; असे मुख्यमंत्री म्हणाले.

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

मुंबईमध्ये लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल आणि बससाठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची प्रणाली तयार होत आहे. यातून नागरिकांना एकाच तिकिटामध्ये प्रवास करता येणार असल्याने बेस्टला याचाही फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

पाच बस डेपोच्या ठिकाणी मराठी सिनेमा थिएटर

बस डेपोंचा पुनर्विकास करताना करमणूक केंद्राचाही विचार करण्याबाबत मंत्री श्री. शेलार यांनी सूचना केल्या. मराठी सिनेमाला उर्जितावस्था येण्यासाठी पाच ठिकाणी मराठी सिनेमा थिएटरची निर्मिती केल्यास यातूनही उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महारेरा ३६९९ प्रकल्पांच्या ‘ओसीं’ची सत्यता तपासणार!

मनपाच्या बजेटमध्ये निधीची तरतूद

बेस्टवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी मुंबई महापालिका मदत करते. मात्र मनपाच्या बजेटमध्ये तीन टक्के वाहतुकीसाठी राखीव तरतूद केली तर याचा बेस्टला फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बेस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास यांनी टोल माफीची आणि कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटीची १६५८ कोटी मिळावेत, अशी मागणी केली. सरकारी कर माफ करण्याचीही मागणी त्यांनी केली. याबाबत प्रस्ताव सादर करावेत, शासन याचा सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

छोट्या गाड्यांचा प्रस्ताव तयार करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, फेरीवाल्यांमुळे रस्ते अरूंद होत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो स्टेशन आणि बेस्ट बसच्या मार्गाचे नियोजन करावे. यासाठी छोट्या अत्याधुनिक बसचा प्रस्ताव तयार करावा. नागरिकांच्या करानुसार सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. मुंबई शहरात बेस्टच्या विविध ठिकाणी जागा आहेत, त्यातूनही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत; असे ते म्हणाले.

बेस्टच्या वातानुकूलित बसचे उद्घाटन

बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईसाठी २१०० वातानुकूलित बसची खरेदी केली असून यातील ५०३ बस मिळाल्या असून आणखी २४०० बस मागविण्यात येणार असल्याची यावेळी माहिती देण्यात आली.

जीपीएससाठी गुगलशी करार

प्रवाशांना सध्या बस कुठे आहे, किती वेळात येईल, यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यासाठी जीपीएस सिस्टीमचा उपयोग होणार आहे. यासाठी बेस्ट गुगलशी करार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बेस्ट बसची स्थिती

सध्या बेस्टकडे २७८३ बस; यामध्ये ८७५ इलेक्ट्रीक बस
लोकसंख्येच्या तुलनेत सात हजार बसची आवश्यकता
रिक्षा, मेट्रो, टॅक्सीपेक्षा कमी भाडे; भाडेवाढीची मागणी
२०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रीक करण्याचा बेस्टचा मानस

Kartik Aaryan Naagzilla Movie : फन फैलाने आ रहा हू… कार्तिक आर्यनचा नागराज अवतार!

‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : करण जोहरने (Karan Johar) नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. ‘नागझिला’ असे या चित्रपटाचे नाव असून यातून सापांच्या वेगळ्याच जगाचे चित्र प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून बॉलीवूडचा लाडका अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan Naagzilla Movie) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने देखील सोशल मीडियावर हटके कॅप्शनमध्ये व्हिडीओ शेार करत याची माहिती दिली आहे.

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

”इन्सानो वाली पिक्चरे तो बहुत देख ली, अब देखो नागों वाली पिक्चर. नाग लोक का पहला कांड….फन फैलाने आ रहा हू..” असे कॅप्शन देत कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) पोस्ट शेअर केली आहे. तसेच हा चित्रपट पुढील वर्षी नागपंचमीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. त्यानुसार १४ ऑगस्ट २०२६ या तारखेला ‘नागझिला’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दरम्यान, कार्तिकने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. कमेंट्समध्ये एका युजरने पुढील वर्ष फक्त कार्तिकचं असेल, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने त्याला ऑल राऊंडर म्हटले आहे. बिगेस्ट ब्लॉकबस्टर लोडिंग असेही तिसऱ्या युजरने म्हटले आहे. असंख्य चाहत्यांनी त्याला फायर आणि हार्ट इमोजी शेअर करून त्याचे स्वागत केले आहे. येणाऱ्या चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा मिळताना दिसत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

कार्तिक आर्यनच्या ‘नागझिला’ चित्रपटाचे शुटींग सप्टेंंबर महिन्यात सुरु होणार आहे. हा चित्रपट साप आणि माणसाच्या संघर्षावर आधारित विनोदी कथा असणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि महावीर जैन यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

वक्फ कायद्यात बदल गरजेचाच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ ला (Waqf Amendment Act 2025) आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारने (Central Government) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) उत्तर दाखल केले आहे. यात गेल्या १०० वर्षांपासून वक्फची मान्यता केवळ नोंदणीवर आधारित असते, तोंडी दाव्यांवर नव्हे, हे सांगत केंद्राने कायद्यातील बदल योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, वक्फ परिषद आणि औकाफ बोर्डामध्ये २२ पैकी जास्तीत जास्त २ बिगर-मुस्लिम सदस्य असतील, जे समावेशितेचे प्रतीक असतील, ते धार्मिक हस्तक्षेप करणारे नाहीत. तसेच, “सरकारी जमिनी चुकीने वक्फ मालमत्ता म्हणून नोंदवण्यात आल्यास त्या महसूल नोंदी दुरुस्त करण्याची गरज आहे” हे केंद्राने स्पष्ट केले आहे. कोणतीही सरकारी जमीन कोणत्याही धार्मिक समुदायाच्या मालकीची मानली जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

संसदीय प्रक्रियेची पारदर्शकता अधोरेखित करत, केंद्राने सांगितले की, या विधेयकावर संसदेच्या संयुक्त समितीच्या ३६ बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाली असून, ९७ लाखांहून अधिक जनतेकडून सूचना व निवेदने मिळाली आहेत. १० प्रमुख शहरांमध्ये जाऊन जनतेची मतं जाणून घेण्यात आली.

कायद्यावर आंशिक स्थगिती लागू शकत नाही, असे केंद्राने न्यायालयाला सांगितले. तसेच संपूर्ण कायदाच रद्द करण्याचीच प्रक्रिया असते, हे सांगून केंद्राने याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे.

लोकसभेत हे विधेयक २८८ मतांनी मंजूर झालं, तर राज्यसभेत १२८ मतांनी पारित झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही याला मंजुरी दिली आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत या कायद्याबाबतची परिस्थिती तशीच राहील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच या प्रकरणात उत्तर देण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि वक्फ बोर्डला सात दिवसांचा वेळ सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता.

या कायद्याला काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि इतरांनी आव्हान दिले असून, सर्वोच्च न्यायालयात याचिकांची सुनावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राचे हे स्पष्ट उत्तर राजकीय आणि न्यायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले आहे.

Sugercane Juice : उसाचा रस प्या अन् गारेगार राहा!

उन्हाळा सुरु झाला की अनेकांना उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शरीरात डिहायड्रेशन होण्याची भीती असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात थंडावा ठेवण्यासाठी अनेक पेय प्यायली जातात. गरमीमध्ये काही लोकांना बाहेर पडलं की सारखंच लिंबू पाणी किंवा इतर थंड पेय प्यावेसे वाटत असतात. तर काहींना उसाचा रस हा फार आवडीचा असतो. बाजारात उसाच्या रसाच्या गाड्या दिसू लागतात. उसाचा रस हे एक चविष्ट आणि किफायतशीर पेय आहे जे बाजारात सहज उपलब्ध आहे. उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही शिवाय यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला एनर्जीसुद्धा मिळते. उसाचा रस पिण्याचे शरीराला खूप फायदे होतात. या लेखातून जाणून घेऊया या फायद्यांबद्धल…

१. ऊर्जा मिळते

उसाचा रस प्यायल्याने शरीराला खूप ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे ही ऊर्जा अनेक तास टिकून राहते. उसाच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या रसात नैसर्गिक साखर देखील असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.

२. वजन कमी करण्यात मदत

वजन कमी करण्यातही उसाचा रस खूप फायदेशीर असतो. यात खूप फायबर असतं. या फायबरमुळं पोट खूप वेळ भरलेलं राहतं. इतर काही खावं वाटत नाही.

३. थकवा दूर होतो

उसाच्या रसामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाळ्यात थकवा जाणवत असेल तर हा रस प्यायल्याने थकवा सुरू होईल.

४. मधुमेहीसुद्धा पिऊ शकतात

मधुमेहीसुद्धा उसाचा रस पिऊ शकतात. या रसात आईसोमाल्टोज नावाचं एक तत्व असतं. यात ग्लायसेमिकचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं मधुमेहींना उसाच्या रसापासून धोका पोचत नाही.

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

५. रोगप्रतिकारशक्ती वाढते

उसाचा रस प्यायल्याने आपलं शरीर स्वतःला अनेक बॅक्टरियल आणि व्हायरल संसर्गांपासून वाचवू शकतं. सोबतच त्यामुळं रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

६. सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर होईल

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि डाग, पांढरे चट्टे दूर करण्यासाठी उसाचा रस प्यायला पाहिजे. यात खूप प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतं.

(टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे

इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. भारताने पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारताला उत्तर देण्याची धडपड सुरू केली आहे. गरज पडली तर सिमला करार मोडू अशी धमकी पाकिस्तानने दली आहे. यामुळे भारत – पाकिस्तान यांच्यात लढाई होण्याची शक्यता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची ताजी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे.

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय गंगाजळी आता फक्त १५.४३६ बिलियन डॉलर एवढीच उरली आहे. पाकिस्तानमध्ये ‘रोटी’ करण्यासाठीचा आटा (पीठ) भारताच्या तुलनेत दुपटीने महाग आहे. पाकिस्तानमध्ये पाच किलो आटा किमान ५६० रुपये दराने उपलब्ध आहे. सध्या पाकिस्तानमध्ये तांदूळ २७५ रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये चण्याची डाळ ५७५ रुपये किलो या दराने मिळत आहे. तसेच पाकिस्तानमध्ये साखर १८५ रुपये किलो आणि सफरचंद ५३० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी टोमॅटो ८१ रुपये किलो दराने मिळत आहे.

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

डिसेंबर २०२४ पर्यंत पाकिस्तानवरचे परकीय कर्ज १३१.१ बिलियन यूएस डॉलर वर पोहोचले. या कर्जाचा विचार करता प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे. पाकिस्तानने चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या तीन देशांकडून मोठे विदेशी कर्ज उचलले आहे. हे कमी म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ४.४ बिलियन यूएस डॉलरचे कर्ज घेतले आहे.

भरमसाठ कर्ज घेणाऱ्या पाकिस्तानने हप्ते फेडणे पण कठीण झाले आहे. वारंवार विनंती करुन पाकिस्तानने २०२४ मध्ये चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या तीन देशांकडून कर्जाच्या परतफेडीची मुदत एक वर्षाने वाढवून घेतली. हे करण्याच्या बदल्यात पाकिस्तानला अनेक अटी शर्तींचे पालन करण्याची तयारी दाखवावी लागली.

Seema Haider: सीमा हैदरला देखील आता पाकिस्तानात परतावं लागणार? जूने प्रकरण पुन्हा चर्चेत

उत्तर प्रदेश: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. तसेच, 48 तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देशदेखील दिले. या निर्णयामुळे भारतात राहत असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना गाशा गुंडाळून घर वापसी करावी लागणार आहे. त्यामुळे, नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider)ला देखील पुन्हा पाकिस्तानला परतावं लागणार का? हा एक मुद्दा उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तानी महिला सीमा हैदर आपल्या ३ मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात येते काय आणि भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न करते काय, गेल्यावर्षी गाजलेल्या या प्रकरणाची आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा होत आहे. सध्या सीमा हैदर उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात राहत असून, अलीकडेच तिने एका मुलीला जन्म दिला आहे. आता ती चार मुलांची आई आहे. मात्र, तिचा भूतकाळ पाहता ती मूळची पाकिस्तानी असल्याकारणामुळे तिला देखील इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे आपल्या देशात परतावे लागणार असल्याची शक्यता जोर धरू लागली आहे. या संदर्भात सीमाच्या वकिलाने तातडीने महत्त्वाची माहिती दिली.

सीमाच्या वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती

सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीमाचा खटला इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळा आहे. सीमाची सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे जमा आहेत. तसेच त्यांची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. सीमाच्या वकिलाने असाही दावा केला की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, ज्यांच्याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या जात होत्या.

वकील एपी सिंह पुढे असे देखील म्हणाले की, सीमाला उत्तर प्रदेश कोर्टाकडून जामीन मिळाला आहे आणि ती सर्व कायदेशीर अटींचे पालन करत आहे. सीमा आश्रयाच्या आधारावर भारतात राहत आहे आणि तिला भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर पूर्ण विश्वास आहे.

सीमाला पाकिस्तानात परत पाठवण्याची पहिल्या पतीची मागणी

दरम्यान, या घटनेदरम्यान, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो सीमाला पाकिस्तानात परत पाठवायला हवे असे म्हणत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने माझ्या मुलांनाही पाकिस्तानात परत पाठवावे. जर तुम्ही सीमाला पाकिस्तानला पाठवू शकत नसाल तर तिला तिथे शिक्षा करा. तिला मदत करणारा, तिचा मानलेला भाऊ एपी सिंहला लाज वाटली पाहिजे.

Rahul Gandhi: “बेजबाबदार वक्तव्य करू नका”, सावरकर यांच्यावरील टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त (Rahul Gandhi Controversial Statement on Savarkar) टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. तसेच भविष्यात अशी विधाने करू नका, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा देखील दिला आहे.

सावरकरांवर बदनामीकारक विधान केल्याच्या प्रकरणात राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. राहुल गांधींविरुद्ध दाखल केलेल्या सावरकर मानहानी खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि तुम्ही त्यांना अशी वागणूक देता, असे विधान करता. भविष्यात अशा प्रकारची बेजबाबदार विधाने केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील”.

सर्वोच्च न्यायालयाचे नेमकं काय म्हटले?

सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्देशात म्हटले की, न्यायालय कोणालाही स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध वादग्रस्त विधाने करू देणार नाही. महाराष्ट्रात सावरकर पुज्यनीय आहेत, तुमच्या आजीनेही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. महात्मा गांधी जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांना पत्रे पाठवत असत तेव्हा ते लिहित असत, तुमचा विश्वासू सेवक. तर त्यामुळे तुम्ही महात्मा गांधींना देखील इंग्रजांचे सेवक म्हणणार का? असा समाचार सर्वोच्च न्यायालयाने घेतला. त्यामुळे आगामी काळात जर अशी विधाने कोणीही केली तर आम्ही या प्रकरणात गंभीर दखल घेऊ आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिला.

काय आहे नेमके प्रकरण?

१७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका रॅलीत भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे त्यांच्या विरुद्ध हा मानहानीचा खटला सुरू झाला.

या रॅलीदरम्यान बोलताना राहूल गांधी यांनी दावा केला होता की सावरकरांनी ब्रिटीश राजवटीत तुरुंगवास भोगत असताना वसाहतवादी मालकांना माफीनामाचे पत्र लिहिले होते. दरम्यान त्यांनी सावरकरांचा उल्लेख ‘ब्रिटिशांचा सेवक’ असा केला होता, तसेच सावरकरांना ब्रिटिश सरकारकडून पेन्शन मिळत होते असे विधान देखील त्यांनी केले होते.

या प्रकरणाबाबत वकील नृपेंद्र पांडे यांनी तक्रार दाखल केली होती, आणि आरोप केला होता की राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान करण्याच्या उद्देशाने हे विधान केले आहे. त्यानुसार राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 153 (A) आणि 505 अंतर्गत प्रथमदर्शनी खटला विचारात घेऊन ट्रायल कोर्टाने त्यांना समन्स बजावले होते.