Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीगृहमंत्री अमित शाह यांचे दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे

गृहमंत्री अमित शाह यांचे दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे

देश कोरोनामुक्त होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो

पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, असे साकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दगडूशेठ गणपतीसमोर घातले आहे. गणरायाला महाअभिषेक करताना शाह यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे शाह यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -