Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीहिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना, सर्व मुस्लीमही हिंदूच होते...

हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना, सर्व मुस्लीमही हिंदूच होते…

हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना, सर्व मुस्लीमही हिंदूच होते; ६०० वर्षांपूर्वी सगळेच काश्मिरी पंडित होते : गुलाम नबी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद ज्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) स्थापन केली. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आझाद जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगत आहेत की, हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे आणि सर्व मुस्लीम आधी हिंदू होते. याआधी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या शेहला रशीद यांचे एक वक्तव्य समोर आले होते, ज्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील विकासासाठी मोदी सरकारचे कौतुक केले होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गुलाम नबी आझाद यांचा व्हिडीओ जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील आहे. आझाद ९ ऑगस्ट रोजी भाषण देण्यासाठी येथे पोहोचले होते. व्हिडीओमध्ये आझाद म्हणतात की, इस्लामचा जन्म १५०० वर्षांपूर्वी झाला होता. भारतात कोणीही बाहेरचा नाही. आपण सर्व या देशाचे आहोत. भारतातील मुस्लीम हे मूळचे हिंदू होते, त्यांनी नंतर धर्मांतर केले. डोडामध्ये दिलेल्या भाषणात ते म्हणाले की, ६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये फक्त काश्मिरी पंडित होते. त्यानंतर अनेक लोक धर्मांतर करून मुस्लीम झाले. यावेळी आझाद यांनी लोकांना बंधूभाव, शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले की, ‘धर्माला राजकारणात मिसळू नये. लोकांनी धर्माच्या नावावर मतदान करू नये.’

धर्माला राजकारणाशी जोडणाऱ्यांवरही गुलाम नबी आझाद यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, राजकारणात जो धर्माचा आधार घेतो तो कमजोर असतो. ज्याची स्वतःवर श्रद्धा आहे, तो धर्माचा आधार घेणार नाही. मी पुढे काय करणार, विकास कसा आणणार हे योग्य व्यक्ती सांगेल, पण जो दुर्बल आहे तो म्हणेल की मी हिंदू आहे किंवा मुस्लीम. म्हणूनच मला मत द्या. भारतीय मुस्लिमांबद्दल बोलताना आझाद म्हणाले की, मुस्लीमही या भूमीत जातात. त्यांचे मांस आणि हाडेदेखील या भारतमातेचा भाग बनतात. मग हिंदू-मुस्लीम कशाला? दोन्ही या मातीत आढळतात. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे हे सगळे एक राजकीय युद्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -