Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखहिंदूंच्या आक्रोश मोर्चाचा इशारा

हिंदूंच्या आक्रोश मोर्चाचा इशारा

मुंबई हे अठरापगड जातींचे शहर आहे. तरीही रविवारी शहरात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा हा अत्यंत विराट होता आणि तो होता लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या विरोधात. विशेष म्हणजे या मोर्चात महिलांची उपस्थिती मोठी होती आणि नेतृत्वही त्याच करत होत्या. हिंदू समाज असा चारही बाजूंनी जागृत झाला आहे, याचीच प्रचिती आली. लव्ह जिहाद म्हणजे हिंदू मुलींना पळवून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणणे आणि लँड जिहाद म्हणजे एक विशिष्ट जमात वेगवेगळ्या जागा मुद्दाम बळकावून संपूर्ण भाग आपल्या जातभाईंच्या ताब्यात देत आहे. या दोन्ही समस्या सध्या ऐरणीवर आल्या आहेत. कारण, त्यामुळे देशाची धर्मनिरपेक्षेतची चौकटच उद्ध्वस्त करण्यात येत आहे. मुंबईसारख्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आपल्या लाडक्या शहरावर एका विशिष्ट धर्माचे आक्रमण झाले, तर ते कुणालाच सहन होणार नाही. त्याविरोधात आवाज उठवण्याचे कर्तव्य अनेक हिंदू संघटना आणि भाजपसारख्या राजकीय पक्षाने पार पाडले आहे. आमदार नितेश राणे यांनीही लव्ह जिहादविरोधात वारंवार आवाज उठवून देशाला आणि समाजाला जागे करण्याचे काम केले आहे. त्यांनी हिदूंचे हे भगवे वादळ आता थांबणार नाही, असे जे म्हटले आहे, त्यातून एका विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करणाऱ्या पक्षांना जोरदार इशारा दिला आहे.

तो गांभीर्याने घेतला पाहिजे. कारण पूर्वीचा निद्रिस्त समाज आता जागृत झाला आहे. अनेक जिहादी आणि रोहिंग्या यांनी मुंबईत येऊन मुंबईतील हिंदूंची संख्या कमी करण्याचे हे खोलवर रचलेले षडयंत्र आहे, असे राणे यांनी म्हटले आहे. सत्यच आहे ते. मुळात हिंदू आणि मुस्लीम असे थेट उल्लेख करणे हेही ज्या काँग्रेस सरकारच्या काळात अब्रम्हण्यम समजले जात होते, त्या काळात हिंदू धर्मीयांना मान ताठ करून जगणेही अशक्य झाले होते. आता वैचारिक परिवर्तन झाले आहे आणि आता आक्रमकपणा हिंदूंमध्येही डोकावू लागला आहे. मुळात कोणताही हिंदू आक्रमक नसतो. पण, त्याच्या अतिसहिष्णुतेचा गैरफायदा लव्ह जिहादच्या मागे असलेल्या शक्ती घेत आहेत. सुखवस्तू कुटुंबे आपापल्या कोषात जगत असल्याने त्यांना लव्ह जिहाद नावाच्या प्रकाराची कुणकुणही लागत नाही आणि मग घरातील अल्पवयीन मुलगी जेव्हा दुसऱ्या जमातीच्या मुलाच्या प्रेमपाशात पडून पळून जाते, तेव्हा या आपल्याच विश्वात रममाण झालेल्या सुशिक्षित कुटुंबास धक्का बसतो. हाच लव्ह जिहाद. यामुळे भारतासारखा एकमेव हिंदूंचा आश्रयस्थान असलेला देश निश्चित धोक्यात आहे.

कितीतरी प्रकरणे अशी आहेत की, ज्यामुळे हिंदू मुलींची आयुष्ये बरबाद झाली आहेत आणि मुंबईत मालाड, मालवणी अशा भागांत जमिनी बळकावून एका विशिष्ट समाजाने तेथे आपले साम्राज्य निर्माण केले आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांनी विशेषतः डावे आणि काँग्रेसने नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केले. उलट काही ठिकाणी तर खतपाणी घातले. ईशरत जहाँ या दहशतवादी तरुणीचे उदात्तीकरण करणारे हेच पक्ष होते. अशा ढोंगी पुरोगामी पक्षांना आणि त्यांच्या जीवावर या देशात अनर्थ घडवून आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशविरोधी शक्तींना रविवारचा मोर्चा हे जबरदस्त उत्तर होते. हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी निवडण्याचे एकमेव कारण म्हणजे त्याद्वारे हिंदूंची जनसंख्या कमी करणे आणि आपली जनसंख्या वाढवणे हेच आहे. मुळात हिंदू ही एक विचारधारा आहे आणि तो धर्म नाही, हे खरे असले तरीही हा हिंदू समाज इतके दिवस मृतवत पडून होता, हेही सत्य आहे. आता त्याच्यात लव्ह जिहाद आणि लँड जिहाद याबद्दल जागृती निश्चितच आली आहे. या समाजाला आपल्या भोवती काय चालले आहे, हेच कळत नव्हते. आता तो जसे डोळे उघडून पाहत आहे, तसे त्याला हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तो पेटून उठला आहे. हिंदू आक्रोश मोर्चाच्या मागण्या अत्यंत रास्त होत्या. धर्मांतरबंदी कायदा देशात लागू करावा आणि मुंबईतील लँड जिहाद रोखावे, या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या होत्या. बेहराम पाडा, मालाड, मालवणी या ठिकाणी काही भागात तर दिवसाही कुणी फिरू शकत नाही, इतकी दहशत आहे. कोणतेही कर न भरता हजारो लोक तेथे राहत असतात. तरीही त्यांना वीज, पाणी वगैरे सारे काही दिले जाते. त्याशिवाय मुंबईसह कित्येक भागात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांची आवक प्रचंड आहे. बांगलादेशी मुस्लिमांना व्होटर कार्डही देण्यात आली. त्यामागे कोणता स्वतःला पुरोगामी म्हणवणारा पक्ष आहे, हे लोकांना माहीत आहे. आता भाजपसह सर्व उजव्या संघटनांनी हा मुद्दा हाती घेतला आणि त्यावर आक्रोश मोर्चा ही काढला कारण हा लाखो हिंदू मुलींचा आक्रोश आहे. श्रद्धा वालकर या मुलीचे तुकडे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात टाकणारा नराधम कोण होता, हे समोर आले आहे. तिने दोन हजार वीसमध्येच पोलिसांकडे आफताबविरोधात तक्रारही केली होती. पण पोलिसांनी तिला मदत केली नाही. जे इतके दिवस स्वतःला हिंदूंचे रक्षण करणारे म्हणवून घेत हिंदूंच्या मतांवर डल्ला मारत होते आणि अचानक सत्तेसाठी आमचे हिंदुत्व जानव्याचे नाही, असे सांगत थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता बळकावली, त्यांच्याच काळात श्रद्धाला न्याय मिळाला नाही, हे तर सत्य आहे. हिंदू साधूंची पाशवी पद्धतीने हत्या झाली तरीही या पक्षात एक तरंगही उठला नाही. अडीच वर्षांत अखेर ते सरकार गेले.

विशेष म्हणजे रविवारचा मोर्चा हा हिंदूंचा आक्रोश मोर्चा असून आणि आपल्यापासून दहा पावलांवर असूनही स्वतःला ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा म्हणवून घेणारा पक्ष त्या मोर्चात सामील झाला नाही. यावरूनच त्या पक्षाची ढोंगबाजी उघड झाली. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या या मोर्चाला जो विराट प्रतिसाद मिळाला, त्यावरून हा प्रश्न हिंदू समाजाच्या किती जिव्हाळ्याचा आहे, तेच सिद्ध झाले. मुलीचे धर्मांतर घडवून आणून नंतर तिला सोडून दिले जाते किंवा तिच्यावर आत्यंतिक अत्याचार केले जातात. हे प्रकार थांबवायचे असतील, तर कायदाच हवा आणि तो केला जावा म्हणून मोर्चा होता. केंद्र सरकारही यावर विचार करेल आणि लवकरात लवकर सक्तीच्या धर्मांतरावर बंदी घालणारा देशव्यापी कायदा करेल, अशी आशा आहे. रविवारच्या मोर्चाने सर्व पुरोगामी पक्षांना एकाच विशिष्ट धर्माचे लांगूलचालन केले, तर भवितव्य नाही, हाही इशारा मिळाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -