Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीHimachal Politics : हिमाचलमधील काँग्रेसचे 'ते' सहा आमदार अपात्र!

Himachal Politics : हिमाचलमधील काँग्रेसचे ‘ते’ सहा आमदार अपात्र!

विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी दिला निर्णय

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत (Himachal Pradesh Legislature) काल मोठी उलथापालथ झाली. विधानसभेत काँग्रेसच्या (Congress) ६ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत भाजपला (BJP) मत दिले आणि भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश धुडकावून लावत भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया (Kuldip Singh Pathania) यांनी या ६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं आहे. पक्षांतरबंदी (Defection ban) कायद्याच्या आधारे त्यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी सांगितलं की, “पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत काँग्रेसच्या ६ आमदारांविरोधात कारवाईबाबतची याचिका माझ्याकडे आली होती. यामध्ये ६ आमदार ज्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली पण त्यांनी पक्षाचा व्हिप मानला नाही आणि राज्यसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. आता ते हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य नाहीत. याबाबत मी ३० पानी आदेशात सविस्तर माहिती दिली आहे” असं पठानिया यांनी स्पष्ट केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -