Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार;

राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार;

मुंबई: संपूर्ण ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस(monsoon) सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात परतला आहे. राज्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र बळीराजा पाऊस होत नसल्याने चिंतेत आहे. पिके जगवण्यासाठी पावसाची गरज आहे. हवामान खात्याने आज राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे . मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोबत मुंबई आणि कोकण परिसरातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा जुलैमध्ये प्रचंड पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिना अक्षऱश: कोरडा गेला. गेल्या १०० वर्षांत असे कधी घडले नव्हते की ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांची स्थिती बिकट झाली आहे. सप्टेंबर महिना अर्धा संपत आला तरी अद्याप हवा तितका पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. अनेक जिल्हे दुष्काळाच्या स्थितीत अडकले आहेत. पिके करपून जात आहेत. पाणीसाठ्यातही घट होऊ लागली आहे. अनेक नद्या अक्षरश: कोरड्याठाक पडल्या आहेत.

दरम्यान, एल निनोचा परिणाम भारतातील हवामानावर झाल्याने त्याचा फटका पावसाला बसला. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -