Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीCorona Vaccine: कोरोना लसीबाबत केला जाणारा 'हा' खळबळजनक दावा आरोग्यमंत्र्यांनी फेटाळला

Corona Vaccine: कोरोना लसीबाबत केला जाणारा ‘हा’ खळबळजनक दावा आरोग्यमंत्र्यांनी फेटाळला

नवी दिल्ली: कोरोना लसीबाबत आलेला खळबळजनक अहवालातील दावा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Health Minister Mansukh Mandviy) यांनी फेटाळला आहे. या अहवालात कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याच प्रमाण वाढलं आहे, असा दावा करण्यात आला आहे. (Corona Vaccine and Heart Attack)

मांडविय यांनी सांगितले की, कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्यांच प्रमाण वाढलं आहे. असा दावा करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी या लसीच्या संशोधनापासून ते लसीकरण करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये शास्त्रिय पद्धतीचा वापर केला आहे. भारतातील लसींसाठी त्याच आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तात करण्यात आली आहे. ज्याची जगातील अतर लसींसाठी केली गेली.

दरम्यान त्यांनी भारतात कोरोना लसींना तात्काळ आणि घाईघाईत मिळालेल्या परवानग्यांवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नावरही उत्तर दिलं. ते म्हणाले की, कोरोना लसींना तात्काळ परवानग्या देण्यात आल्या कारण आता जुन्या काळाप्रमाणे धीम्या प्रकियेने लस बनत नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराने ही प्रक्रिया सोपी झाली. त्यामुळे लस तयार करण्याची प्रक्रिया जलद झाल्यामुळे लसीला परवानगी देखील लवकर मिळते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -