Monday, May 20, 2024
Homeदेशमाजी पंतप्रधान डाव्यांसोबत जाणार, कर्नाटकाच्या निवडणूकीत मोठा ट्वीस्ट

माजी पंतप्रधान डाव्यांसोबत जाणार, कर्नाटकाच्या निवडणूकीत मोठा ट्वीस्ट

बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणूक ऐन रंगात येत असताना जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी महत्वाची घोषणा केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डावे पक्ष ज्या गटाला समर्थन देतील किंवा बाजुने उभे राहतील त्यांना जेडीएस समर्थन देईल अशी घोषणा देवेगौडा यांनी केली आहे. देवेगौडा यांनी अशाप्रकारे डाव्यांचे उपकार फेडले आहेत.

१९९६ साली एचडी देवेगौडा अचानक देशाचे पंतप्रधान बनले होते. खरंतर, तेव्हा डाव्या पक्षांचे नेते ज्योती बसू यांना पंतप्रधान होण्याची संधी होती. परंतू, त्यावेळी बसू यांनीच देवेगौडांचे नाव पुढे केले व देवेगौडा पंतप्रधान बनले. यामुळे आता कर्नाटक निवडणूकीत देवेगौडा तेव्हाचे उपकार फेडले आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता एक वर्ष शिल्लक राहिले आहे. यानिवडणुकीसाठी विरोधी पक्ष भाजपाविरोधात मोठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्नात आहे. यामध्ये शरद पवार, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव सक्रीय आहेत. या निवडणूकांच्या वेळी कोणाला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करायचे हे जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल यावर अवलंबून आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -