मेट्रो कारशेडच्या जमिनीवरील खाजगी मालकी हायकोर्टाने फेटाळली

Share

मुंबई (हिं.स.) : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने आदर्श वॉटर पार्क ॲण्ड रिसॉर्ट या खाजगी कंपनीचा मालकी हक्क फेटाळला आहे. त्यामुळे राज्य सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही इतरांच्या मालकी हक्काचा वाद प्रलंबित आहे. मेट्रो कारशेडच्या जमिनीच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेला मूळ वाद राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात असून तो मिटणे आवश्यक आहे. उपरोक्त वादावर दोन्ही पक्षांकडून मंगळवारी युक्तिवाद पूर्ण झाला आणि त्यानंतर आज (बुधवारी) न्यायालयाने संबंधित खाजगी कंपनीचा मालकी हक्क फेटाळून लावला.

कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड येथील जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा आदर्श वॉटर पार्कने केला होता. त्या विरोधात राज्य सरकारने न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने आदर्श वॉटर पार्कचा दावा फेटाळला. आदर्श वॉटर पार्कने चुकीच्या पद्धतीने जमीन (फ्रॉड करून) घेतल्याचे न्यायालयाने मान्य केले. तसेच आदर्श वॉटर पार्कचे मालकी हक्क रद्द केले आहेत.

त्यामुळे आता आता मालकी हक्काबाबत राज्य सरकार, गरोडीया कंपनी आणि केंद्र सरकार या तिघांमध्ये वाद आहे. त्यावर पुढे युक्तिवाद सुरू राहिल. मात्र, ज्या कारणामुळे न्यायालयाने मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे ती स्थगिती उठण्यासाठी आधी राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यातील मालकी हक्कचा वाद मिटणे आवश्यक आहे. आता आदर्श वॉटर पार्कचा मालकी हक्क रद्द न्यायालयाने रद्द केल्यामुळे मेट्रो कारशेडच्या कामातील एक अडथळा दूर झाला आहे.

Recent Posts

नारायण राणेंना ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची मिळाली असती तर…राज ठाकरेंकडून कौतुक

कणकवली: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. त्यातच नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज…

12 mins ago

“…मग बघू कोण कोणाला गाडतो”, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान

कुडाळ (प्रतिनिधी): रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित महायुती…

3 hours ago

Jammu-Kashmir Accident: अनंतनागमध्ये मोठा अपघात, दरीत कोसळले सैन्याचे वाहन, एका जवानाचा मृत्यू, ९ जखमी

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. अनंतनागमध्ये सैन्याचे एक वाहन दरीत कोसळले. या…

3 hours ago

अक्षय्य तृतीयेला घरी आणा लक्ष्मी मातेच्या या प्रिय गोष्टी, वाढेल धनदौलत

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला तिथी साजरी केली…

3 hours ago

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेच्या संघाची घोषणा, भारतीय खेळाडूंचा भरणा

मुंबई:आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(icc mens cricket world cup 2024) क्रिकेट चाहते अतिशय आतुरतेने वाट…

5 hours ago

Loksabha Election 2024: मतदानाआधी दिल्ली काँग्रेसला झटका, माजी प्रदेश अध्यक्ष अरविंदर सिंह लवली भाजपमध्ये

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष…

6 hours ago