Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाHardik pandya: हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा

Hardik pandya: हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा

मुंबई: टीम इंडियाचा(team india) स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या(hardik pandya) संघातील पुनरागमनबाबतचा सवाल आणखी खोल होत चालले आहे. वनडे विश्वचषकानंतर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे(injury) टीम इंडियाबाहेर आहे. हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसवर काम करत आहे. मात्र अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की मैदानावर तो कधी परतणार आहे. इतकंच नव्हे तर ज्या पद्धतीने शिवम दुबे फॉर्ममध्ये आहे ते पाहता हार्दिक पांड्याच्या जागेबाबत धोका निर्माण झाला आहे.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने शिवम दुबेला संघात स्थान दिले. अफगाणिस्तानविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या टी-२० मालिकेत शिवम दुबेचा फॉर्म कमालीचा आहे. दोन्ही सामन्यात त्याने नाबाद अर्धशतक ठोकलेत. या कामगिरीमुळे आता चर्चांना उधाण आले आहे की बीसीसीआय आता शिवम दुबेला सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्ट देण्यावर विचार करत आहे. जर असे झाले आणि आयपीएलमध्येही त्याचा फॉर्म कायम राहिला तर टी-२० विश्वचषकात खेळण्याच्या शक्यता वाढू शकतात.

रोहितचे कमबॅक

हार्दिक पांड्याने नेट्सवर पुनरागमन केले आहे. असे मानले जात आहे की हार्दिक पांड्याचे आता आयपीएलदरम्यान पुनरागमन होऊ शकते. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे. जर हार्दिक पांड्या सुरूवातीच्या सामन्यात अनुपस्थित असेल तर संघाचे नेतृ्त्व कोण करेल असाही सवाल आहे.

बीसीसीआयने हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने एक बॅकअप प्लान तयार केला आहे. १४ महिन्यांनी रोहित शर्मा टी-२०मध्ये परतला आहे. पहिल्या दोन सामन्यात रोहितची बॅट चालू शकली नाही. मात्र रोहितकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आयपीएलचा पूर्ण हंगाम आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -