Friday, May 17, 2024
Homeक्रीडाIPL 2024GT vs SRH: गुजरात टायटन्सकडून सनरायजर्स हैदराबादचा पराभव

GT vs SRH: गुजरात टायटन्सकडून सनरायजर्स हैदराबादचा पराभव

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(indian premier league 2024) १२व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना सनरायजर्स हैदराबादशी झाला. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात गुजरातने सनरायजर्स हैदराबादला सात विकेटनी हरवले. सामन्यात गुजरातला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान मिळाले होते. गुजरातने हे आव्हान पाच बॉल राखत पूर्ण केले.

मिलर-सुदर्शनने बदलला गेम

गुजरात टायटन्ससाठी इम्पॅक्ट प्लेयर साई सुदर्शनने सर्वाधिक ३६ बॉलमध्ये ४५ धावा केल्या. यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. डेविड मिलरने २७ बॉलमध्ये ४४ धावांची खेळी केली. मिलरने आपल्या खेळीदरम्यान चार चौकार आणि दोन षटकार लगावले. मिलर-सुदर्शन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली गेली. गुजरातचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय होता तर सनरायजर्स हैदराबादच्या तीन सामन्यांमध्ये हा दुसरा पराभव होता.

सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करताना सनरायजर्स हैदराबादने आठ विकेट १६२ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबदासाठी अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी २९-२९ धावा केल्या. अब्दुल समदने १४ चेंडूंचा सामना केला.तर अभिषेकने २० बॉलमध्येही खेळी साकारली.

या सामन्यात गुजरात टायटन्सच्या प्लेईंग ११मध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळाले होते. वेगवान गोलंदाज स्पेंन्सर जॉनसरच्या जागी अफगाणी स्पिनर नूर अहमदची एंट्री झाली. तर स्पिनर साई किशोरच्या जागी वेगवान गोलंदाज दर्शन नालकंडेला संधी मिळाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -