Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाग्रेगर बार्कले पुन्हा आयसीसीच्या अध्यक्षपदी

ग्रेगर बार्कले पुन्हा आयसीसीच्या अध्यक्षपदी

जय शहा आर्थिक समितीचे प्रमुख

लंडन (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडचे क्रिकेट प्रशासक आणि वकील ग्रेगर बार्कले पुन्हा एकदा आयसीसीच्या अध्यक्षपदी कायम आहेत. शनिवारी त्यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्रेगर बार्कले यांची सलग दुसऱ्यांदा या पदावर निवड झाली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना आर्थिक समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे.
तवेंगवा मुकुहलानी यांनी आपले नाव मागे घेतल्याने आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. पुढील दोन वर्षे ते या पदावर राहतील.

बार्कले हे नोव्हेंबर २०२०मध्ये प्रथमच आयसीसीचे अध्यक्ष बनले होते. ते न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचेही अध्यक्ष होते. त्यांना २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकाचे संचालक देखील बनवण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचेही नाव आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र बीसीसीआयच्या प्रमुखपदावरून पायउतार झाल्यानंतर गांगुली यांनी अर्ज भरला नाही. आतापर्यंत चार भारतीयांनी हे पद भूषवले आहे. यामध्ये जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांचा समावेश आहे. आयसीसीचे १६ बोर्ड सदस्य मिळून त्यांचा अध्यक्ष निवडतात. त्यात १२ कसोटी खेळणारे देश आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -