Tuesday, May 14, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023Glenn Maxwell: पाकिस्तानसाठी मॅक्सवेलने आणला दुहेरी आनंद

Glenn Maxwell: पाकिस्तानसाठी मॅक्सवेलने आणला दुहेरी आनंद

मुंबई: विश्वचषक २०२३(world cup 2023) ही स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे तसतसा या स्पर्धेतील रोमांचकपणा वाढत आहे. स्पर्धेत मंगळवारी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक सुरूवातीनंतर त्यांनी अफगाणिस्तानला ३ विकेटनी हरवले. यासोबतच सेमीफायनलसाठी क्वालिफाय करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसरा ठरला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आधीच सेमीफायनल गाठली आहे. चौथ्या संघाबाबत निर्णय होणे बाकी आहे. या स्पर्धेत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. मॅक्सवेलच्या दुहेरी शतकाने बाबर अँड कंपनीला मात्र मोठा आनंद झाला आहे. कारण अफगाणिस्तानने हा सामना जिंकला असता तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचा मार्ग खूपच कठीण झाला असता.

ग्लेन मॅक्सवेलच्या शतकाव्यतिरिक्त पाकिस्तानसाठी आणखी एक दुसरी खुशखबर बंगळुरूतून येत आहे. येथे ९ नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात्र बंगळुरूमध्ये पावसाची ८० टक्के शक्यता आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण मिळेल.

दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने ११ नोव्हेंबरला इंग्लंडला हरवले तर त्यांचे १० गुण होतील. यानंतर त्यांच्या सेमीफायनलमधील आशा वाढील. कारण जर अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवले तरी त्यांचा नेट रनरेट खराब आहे. अशातच त्यांना जर पॉईंट टेबलमध्ये पाकिस्तानच्या वर जायचे असेल तर आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे.

१९९२मध्येही पावसाने पोहोचवले होते सेमीफायनलमध्ये

पाकिस्तानसाठी पावसाने याआधीही वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसाठी आनंद आणला आहे. संघाने आतापर्यंत १९९२मध्ये खिताब जिंकला आहे. या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ ८ सामन्यात ४ सामने जिंकत पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर होता. त्यांचा एक सामना इंग्लंडविरुद्ध पावसामुळे रद्द झाला होता. ऑस्ट्रेलियाचे ८ सामन्यात ८ पॉईंट होते. त्यांचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला होता. दरम्यान, इंग्लंड आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान पावसाने खोडा घातला. याचा फायदा हरायला आलेल्या पाकिस्तानला झाला. सामना रद्द करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -