Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीगणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी एसटीच्या अडिच हजारजादा गाड्या

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी एसटीच्या अडिच हजारजादा गाड्या

एक हजार ३०० गाड्यांचे आरक्षण आजपासून सुरू

मुंबई (प्रतिनिधी) : गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून २५ जूनपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल.

या जादा गाड्या मुंबई, ठाणे, पालघर मधून उपलब्ध केल्या जातील. या गाड्यांचे आरक्षण हे तिकीट खिडक्या, ऑनलाईन आणि एसटी महामंडळाकडून नियुक्त एजन्टकडूनही मिळणार आहे. या जादा गाड्यांव्यतिरिक्त ग्रुप आरक्षणासाठीही लवकरच एसटी उपलब्ध केल्या जातील. या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्यास अधिक गाड्या सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने ठेवली आहे. यंदा गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. अनेक जण साधारण चार ते पाच दिवस आधीच गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. यंदा रेल्वेगाड्यातील आरक्षण संपल्याने एसटी महामंडळाने जादा गाड्यांची घोषणा करून दिलासा दिला आहे.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -