Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीगगनयान मिशनद्वारे ४ अंतराळवीर जाणार अंतराळात, इस्त्रो प्रमुखांसाठी हे आहे मोठे चॅलेंज

गगनयान मिशनद्वारे ४ अंतराळवीर जाणार अंतराळात, इस्त्रो प्रमुखांसाठी हे आहे मोठे चॅलेंज

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे(isro) अध्यक्ष एस सोमनाथ शनिवारी म्हणाले की भारताच्या पहिल्या मानव अंतराळ यान गगनयानसाठी(gaganyan) निवडण्यात आलेले अंतराळवीर तयार आहे आणि ते २०२५ची प्रतीक्षा करत आहेत. गगनयान कार्यक्रमाचे लक्ष्य हे २०२५मध्ये तीन दिवसांच्या मिशनसाठी चार अंतराळवींरांना अंतराळात पाठवणे आणि सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत घेऊन येणे.

काय आहे या मिशनचे मोठे आव्हान?

सोमनाथ म्हणाले, इस्त्रो हे मिशन यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. पहिल्या मिशनसाठी आम्ही त्या चार जणांना निवडले आहे. आमचा प्रयत्न आहे की २०२५पर्यंत त्यांना अंतराळात पाठवले जाईल आणि सुरक्षितरित्या परत आणले जाईल. त्यांना सुरक्षितरित्या पृथ्वीवर आणणे हे या मिशनचा महत्त्वाचा उद्देश आहे.

आम्ही दिवस रात्र काम करत आहोत

सोमनाथ पंडित दीनदयाळ उर्जा विश्वविद्यालयाच्या ११व्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. गगनयान मिशन यशस्वी करण्यासाठी येणाऱ्या दिवसांत बऱ्याच तांत्रिक गोष्टी विकसित करणे गरजेचे आहे. इस्त्रोमध्ये आम्ही हे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहोत. येणाऱ्या दिवसांत मानवरहित अनेक मिशन पाहू आणि अखेरीस भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल. यासाठी अंतराळवीर आधीपासूनच तयार आहेत.

इस्त्रो एक अंतराळ स्टेशन बनवण्याबाबतही विचार करत आहे जे वैज्ञानिक तसेच तांत्रिक प्रगती तसेच उद्योगांसाठी विविध क्षेत्रात काम करण्यासाठी गरजेचे आहे. चांद्रयान ३ बाबत बोलताना सोमनाथ म्हणाले, भारताकडे या श्रेणीच्या
उच्च प्रोद्यौगिकी योजना पूर्ण करण्यासाठीचा आत्मविश्वास आहे. आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा पहिला देश बनलो आहोत आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनलो आहोत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -