Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीNilesh Rane : 'सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय'

Nilesh Rane : ‘सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय’

माजी खासदार निलेश राणे यांची निवृत्तीची घोषणा

कणकवली : सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दसऱ्याच्या दिवशी सक्रिय राजकारणातून कायमची निवृत्ती घेत असल्याचे ट्विट केले आहे.

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी मन मोकळे केले आहे.

मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले. कारण नसताना माझ्या सोबत राहिलात, त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम भेटले आणि भाजप सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकारणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचे मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणे वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -