Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीपुण्यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत माजी नगरसेविकेवर अत्याचार

पुण्यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत माजी नगरसेविकेवर अत्याचार

पुणे : मैत्री संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात माजी नगरसेविकेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपूर्ण संबंध होते. याच मैत्रीचा फायदा घेत तुझ्या पतीला फोटो दाखवेन आणि सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडित नगरसेविकेवर वारंवार अत्याचार केला. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून १० लाख रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे.

आरोपीकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून पीडित नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -