Saturday, May 4, 2024
HomeदेशUP's Former CM Mayavati : माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या भावाने आणि त्याच्या...

UP’s Former CM Mayavati : माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या भावाने आणि त्याच्या पत्नीने केला मोठा घोटाळा!

लखनऊ: बहुजन समाज पक्षाच्या (BSP) आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांच्या भाऊ आनंद कुमार आणि भावाच्या पत्नी विचितेर लता यांना रिअल इस्टेट फर्म लॉजिक्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडने  (Logix Infratech Private Ltd) विकसित केलेल्या नोएडा (Noida) अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील तब्बल २६१ फ्लॅट ४६ टक्के सवलतीच्या दरात (Discount) दिले आहेत. ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले असून त्यामध्ये १२ वर्षांहून अधिक काळ म्हणजेच कंपनीच्या स्थापनेपासून दिवाळखोरीच्या कार्यवाहीपर्यंत आणि त्यानंतरच्या मे २०२३ च्या फॉरेन्सिक ऑडिटपर्यंतच्या घटनांच्या क्रमांचा इंडियन एक्स्प्रेसने अभ्यास केला आहे.

याबाबतच्या ऑडिट अहवालानुसार आनंद कुमार यांची २८.२४ कोटींची देयके दाखवणारे व्हाउचर गुंतवणूक म्हणून न दाखवता ग्राहकांकडून आगाऊ (Advanced) या शीर्षकाखाली दाखवण्यात आली आहेत. आनंद कुमार यांच्या पत्नी विचितेर लता यांच्यावरही अनियमिततेचे जवळपास असेच आरोप करण्यात आले होते. कमी किंमतीतून १२५ पैकी २४ युनिट्स इतरांना वाटप केले आहेत आणि याचे व्यवहार २८.८५ कोटी लॉजिक्सद्वारे संबंधित पक्षांना कोणतेही स्पष्टीकरण न देता हस्तांतरित केले आहे, असेही ऑडिट अहवालात म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये आनंद कुमार यांना प्रति चौरस फूट २३०० रुपये या दराने बिल देण्यात आली होती. यावेळी हीच युनिट्स इतर गृहखरेदीदारांना प्रति चौरस ४.३५०.८५ रुपये या दराने विकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, दिवाळखोरी कायदा २०१६ च्या कलम ४५ अंतर्गत व्यवहारांचे मूल्य कमी केले गेले आहे, असे ऑडिट अहवालात नमूद केले आहे. तसेच, त्यांना वाटप केलेल्या तब्बल ३६ युनिट्स आधीच इतरांना विकण्यात आल्या होत्या, त्यामुळे वाटपप्रक्रियेत फसवणूक झाल्याचेही यातून स्पष्ट होत असल्याचं ऑडिटमध्ये नमूद आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -