Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीFire : साकीनाका येथे पाच मजली इमारतीला आग

Fire : साकीनाका येथे पाच मजली इमारतीला आग

मुंबई : अंधेरी पूर्व येथील साकीनाका परिसरातील एका पाच मजली इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. इमारतीमधील वीज मीटरला लागलेल्या आगीचा भडका उडाला आणि परिसरात घबराटीचे वातावरण पसरले.

या इमारतीमध्ये एकूण ३३ रहिवासी अडकले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी ३३ रहिवाशांना सुखरुपपणे इमारतीतून बाहेर काढले.

साकीनाका परिसरातील ९० फूट रस्त्यावरील डिसोझा कम्पाऊंडमधील साकी हाऊसिंग सोसायटीतील वीज मीटरला शनिवारी सकाळी ९च्या सुमारास आग लागली. क्षणार्धात आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. ही आग तळमजला आणि पहिल्या मजल्यावर पसरल्याने इमारतीत रहिवासी अडकले होते. आगीमुळे इमारतीमध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. धुरामुळे रहिवाशांना जिन्यावरून खाली येणे शक्य होत नव्हते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -