Categories: कोलाज

Father’s Day : फादर्स डे!

Share

गरजेच्या, अडचणीच्या, अपयशाच्या वेळी प्रथम वडिलांची आठवण येते. जरी ते आपल्याला मदत करू शकत नसले तरी केवळ ज्यांची उपस्थिती आपल्याला सांत्वन आणि बळ देते, ते म्हणजे वडील.

  • गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

पत्नी वारली, तेव्हा सहा मुलांपैकी मोठा १६ वर्षांचा आणि छोटी २ वर्षांची होती. “आता मुलाची आई नाही, तर तू मुलांकडे कसं लक्ष देणार? उद्योगधंदा कसा करणार? शहरात राहणाऱ्या काका, मामा याजकडे एकेकाला पाठव”. असे अनेक उपदेश ऐकत वडिलांनी स्पष्ट केले, “माझी मुले माझ्याजवळचं राहतील, आम्ही आमचे काम, उदरनिर्वाहाचे पाहू.” घरातंच स्वतःसकट मुलांत कामाची विभागणी केली. त्यामुळे आम्हा मुलांचे आपसांत आणि वडिलांशी घट्ट नाते तयार झाले. लवकरच वडिलांना संधिवाताचा ॲटॅक आल्याने शेतीकाम जमेना. नाउमेद न होता शेत विकून शेतीविषयक अवजारांचे दुकान सुरू केले व बाजूला घर स्थलांतरित केले. घर, दुकान उत्तम चालले. सगळी मुले शिकली. लग्नकार्ये होऊन त्या छोट्या घर-दुकानांत नातवंडे खेळू लागली. “पत्नीच्या पश्चात मुलांचं उदरभरण, संगोपन व प्रेम करणं हेच कर्तव्य मानणारा, मुलांचा आनंद हीच जीवनाची फलश्रुती मानणाऱ्या माझ्या परमप्रिय पित्यावर” त्यावेळी १६ वर्षांच्या असलेला मुलाने, व्याहर्न फ्लॅटने लिहिलेला हा लेख! असे अनेक विधुर जगभर आई-वडील या दोन्ही भूमिकेतून मुलांचे संगोपन करतात. अशाच एका गोष्टीतून ‘फादर्स डे’चा जन्म झाला.

१९०९ मध्ये सोनोरा स्मार्ट डॉड या वॉशिंग्टन महिलेने आपल्या गावी चर्चमध्ये ‘मदर्स डे’च्या प्रवचनाने प्रेरित होऊन विचार केला, वडिलांचा सन्मान करण्यासाठी असाच एक दिवस बाजूला ठेवला पाहिजे जो ‘मदर्स डे’ला प्रतिबिंबित करेल. तिचे वडील जॅक्सन स्मार्ट हे गृहयुद्धात दिग्गज! याच विधुर पालकाच्या सोनोरा मुलीने आपल्या प्रेमासाठी आजीवन बलिदान देणाऱ्या वडिलांचा १९ जूनला वाढदिवशी चर्चमध्ये ‘फादर्स डे’ साजरा केला होता.

त्या आधी १९०७च्या मोनोगाह कोळशाच्या खाण स्फोटात अनेक मुलांनी आपले वडील गमावले. ग्रेस गोल्डन क्लेटन या महिलेने मुलांना जन्म देणाऱ्या पुरुषांच्या या दुर्दैवी मृत्यूच्या स्मरणार्थ ‘फादर्स डे’ करावा असा प्रस्ताव दिला. ५ जुलै १९०८ वेस्ट व्हर्जिनियाच्या चर्चमध्ये वडिलांना समर्पित असा देशाचा पहिला कार्यक्रम झाला.

अनेक कॅथलिक राष्ट्रांमध्ये १९मार्च या दिवशी ‘फादर्स डे’द्वारे सेंट जोसेफ यांना सन्मानित केले जाते.

फादर्स : वडील/आजोबा. वडिलांनी मुलांच्या जीवनांत दिलेल्या योगदानाचा आदर व्यक्त करण्यासाठी, जगभरात जूनच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो.

निर्मिती आणि संगोपनाशी निगडित असलेल्या जैविक पालकत्वात वडील हे कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ! ते संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधतात. कुटुंबासाठी कष्ट करणारा, कुवतीप्रमाणे मुलांना भेटवस्तू देऊन आनंद देणारा, मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने बद्ध असतो. गरजेच्या, अडचणीच्या, अपयशाच्या वेळी प्रथम वडिलांची आठवण येते. जरी ते आपल्याला मदत करू शकत नसले तरी केवळ त्यांची उपस्थिती आपल्याला सांत्वन आणि बळ देते. असाही अनुभव आहे, ज्या घरांत वडील आहेत, त्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत नाहीत. वडील बाहेरच्या जगात वावरत असल्यामुळे, मुलांना आपले वडील हिरो वाटतात. आजच्या जगात व्यस्त, दमलेल्या बाबाची कहाणी संदीप खरे यांनी लिहिली आहे.

प्रत्येक महान मुलीच्या मागे तिचा पिता असतो. इंदिरा गांधी, मिशेल ओबामा म्हणतात, “माझ्या वडिलांनी मला कठोर परिश्रम करायला, अनेकदा हसायला, आणि माझे शब्द पाळायला शिकवले.” वित्तीय अधिकारी असलेल्या रश्मी जोशी म्हणतात, “मला शिक्षिका व्हायचे होते. बाबा टाटा कंपनीत सेक्रेटरी असल्याने त्याच्या प्रोत्साहनामुळे मी सीए, सीएस झाले.”

‘फादर्स डे’ हा वैयक्तिक उत्सव आहे. वडिलांसोबतच्या बालपणीच्या आठवणी जगवणे. पालक पिता – जन्मजात पालकांना दुरावलेले भगवान श्रीकृष्ण, दानशूर कर्ण यांचे बालपण आपण जाणतो. आनंदवन उभारून अनेकांचे बाबा झालेले बाबा आमटे.सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रश्न लेखणीतून मांडणारे, सर्वांचे बाबा डाॅ. अनिल अवचट. ब्रह्मचारी/मिस्टर इंडिया या चित्रपटातील भूमिका प्रत्यक्ष निभावणारे काही तरुण. मराठवाड्यातील गेवराई तालुक्यातील संतोष गर्जे अंदाजे ५० मुलांचे पालकत्व निभावत आहे.

काळ बदलला, प्रश्न बदलले. अविवाहित राहून अनेक तरुण मुलगे मूल दत्तक घेऊन ‘एकल पालकत्व’ स्वीकारत आहेत. ‘बॅचलर डॅड’ पुस्तकात तुषार कपूर लिहितो, एकल पालकत्व सोपं नाही, पण आनंददायी आहे. मुलांचा सहवास, त्यांना घडविताना मिळणारे समाधान या आनंदाची तुलना कशाही बरोबर होऊ शकत नाही. नेल्सन मंडेला म्हणतात, “राष्ट्राचे पिता बनणे हा मोठा सन्मान आहे; परंतु कुटुंबाचे पिता बनणे हा त्याहून मोठा आनंद आहे.”

फादर्स/पिता – एखादी गोष्ट शोधण्यात किंवा शोध लावल्यास, मदत करणाऱ्या माणसाला, त्या अस्तित्वाचा किंवा शोधाचा जनक/पिता म्हणतात.

देशाच्या प्रगतीत पितामह ठरलेल्या काही व्यक्ती –

१. धुंडिराज गोविंद फाळके, यांनी २५ डिसेंबर १८९१ रोजी मुंबईत ‘लाईफ ऑफ ख्रिस्त’ हा परदेशी चित्रपट पहिला आणि त्यांची जगण्याची दिशाच बदलली. दादरला स्वतःचा स्टुडिओ बांधला. स्वतः सर्जनशील कलाकार, कला शाखेचे शिक्षण घेतलेले. १९१३मध्ये दोघा पती-पत्नीच्या अथक प्रयत्नातून ‘राजा हरिश्चन्द्र’ हा महाराष्ट्रात, भारतात पहिला मूक चलचित्रपट काढल्याने दादासाहेब फाळके यांना “फादर ऑफ सिनेमा” म्हणतात.

२. पीएच.डीनंतर विक्रम साराभाई भारतात परतल्यावर ‘भारतीय अंतराळ संशोधन’ सुरू केले म्हणून थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांना “फादर ऑफ स्पेस” म्हणतात. इस्त्रोचे पहिले अध्यक्ष साराभाई होते. विक्रम साराभाईंनीच इस्त्रोची पुढील दिशा आखली.

३. भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीला भावना असतात, त्याचसोबत रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ॲाप्टिकसचा शोध लावणारे पहिले शास्त्रज्ञ. विद्युत चुंबकीय लहरी हवेच्या मदतीने दूरच्या ठिकाणी पोहोचू शकतात. या महान शोधामुळे रडार, इंटरनेट, रिमोट यांचा जग अनुभव घेत आहे. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना रेडिओ विज्ञानाचे जनक/पितामह म्हणतात.

आजच्या जगात मुलांवर वडिलांचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. वडिलांनी मुलांना वेळ, प्रेम आणि प्रोत्साहन देणं महत्त्वाचे आहे. तसेच मुलांनीही आपल्या पालकांना त्यांच्या वृद्धापकाळी प्रेम आणि सेवा दिल्यास ‘फादर्स डे’ खऱ्या अर्थाने साजरा होत राहील.

हे पण वाचाFather’s day 2023 : फादर्स डे निमित्त वडिलांना कोणते गिफ्ट द्याल?

Tags: fathers day

Recent Posts

IPL 2024 Playoffs: हंगामातील ५० सामने पूर्ण, ५ संघांचे नशीब इतरांच्या हाती

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…

2 hours ago

Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…

3 hours ago

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…

4 hours ago

Dream: नशीब बदलतील स्वप्नात दिसलेल्या या ३ गोष्टी

मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…

5 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…

7 hours ago

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

10 hours ago