Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिकमधील तीन लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत

नाशिकमधील तीन लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत

नाशिक : भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४चा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघांवर निवडणूक यंत्रणा जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तयारीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यात लोकसभेकरिता २०-दिंडोरी, २१-नाशिक व ०२-धुळे (अंशत:) हे मतदार संघ समाविष्ट होतात. २०-दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये ११३-नांदगाव, ११७ कळवण, ११८-चांदवड, ११९-येवला, १२१-निफाड, १२२-दिंडोरी हे विधानसभा मतदार संघ समाविष्ट होतात. २०-दिंडोरी लोकसभा मतदार संघ अनुसूचित जमातीकरिता राखीव असून सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६५.६६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजविला होता.

२१-नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये १२०-सिन्नर, १२३ नाशिक पूर्व, १२४-नाशिक मध्य, १२५-नाशिक पश्चिम, १२६-देवळाली व १२७-इगतपुरी हे विधानसभा मतदार संघ समाविष्ट होतात. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये ५९.४३ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजविला होता.

०२-धुळे लोकसभा मतदार संघामध्ये नाशिक जिल्ह्यातील ११४ – मालेगाव मध्य, ११५-मालेगाव बाह्य व ११६- बागलाण हे ३ विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत. भारत निवडणूक आयोगाकडील अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा हे नाशिक व धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी हे दिंडोरी लोकसभा मतदार संघाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरिता भारत निवडणूक आयोगाकडील अधिसूचनेनुसार सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मान्यतेने सदर पदावरील बहुतांश अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

एकंदरीत भारत निवडणूक आयोग यांचेकडील मार्गदर्शक सूचनांनुसार बदल्यानंतर नाशिक जिल्ह्यात बहुतांश निवडणूक संबंधित कामकाजाकरिता अधिकारी नियुक्त करण्यात आलेले असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता नाशिक जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांचे नेतृत्वाखाली सज्ज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -