Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीEknath Khadse : ...तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं!

Eknath Khadse : …तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं!

मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना एकनाथ खडसे झाले भावूक

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना फोन केला असता मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एअर ॲम्ब्युलन्सची (Air Ambulance) व्यवस्था केली आणि खडसेंना वेळेवर उपचार मिळण्यात यश आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून ती सुधारत असल्याची माहिती खडसेंनी स्वतः एक ट्विट करत दिली आहे. दरम्यान, वेळप्रसंगी धावून आलेल्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन खडसेंनी त्यांचे आभार मानले आहेत.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून घडलेला प्रसंग सांगितला. एकनाथ खडसे म्हणाले, ‘आपण वेळेवर मदतीला धावून आलात. एअर ॲम्ब्युलन्स पाठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपलं विमान जर वेळेवर आलं नसतं तर आमच्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं’. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच दिवाळीच्या देखील (Diwali) शुभेच्छा दिल्या.

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते. त्यावेळी तिथून त्यांनी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि खडसेंना जळगावहून मुंबईत आणण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या प्रयत्नाने त्यांचे प्राण वाचले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू केलं.

एकनाथ खडसेंनी मानले हितचिंतकांचे आभार

एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत: ट्विट करत तब्येत चांगली असल्याची माहिती दिली. एकनाथ खडसे म्हणाले, मला हृदयविकाराचा त्रास झाला. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद, अशा शब्दांत खडसेंनी सर्व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -