Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीNitin Desai Suicide case : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी आरोपी कंपनीला हायकोर्टाचा दिलासा...

Nitin Desai Suicide case : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी आरोपी कंपनीला हायकोर्टाचा दिलासा नाही

काय होती तक्रार?

मुंबई : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात (Nitin Desai Suicide case) एडेलवाईज कंपनीवर (Edelweiss company) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या आरोपींनी हायकोर्टात (High Court) धाव घेतली होती. पण, आरोपींना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींची आज चौकशी होणार आहे, त्यासाठी ते कागदपत्रांसह खालापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

खालापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा तसेच अटकेपासून दिलासा मिळावा याकरता आरोपींनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने तुर्तास दिलासा देण्याचे नाकारले असून १८ ऑगस्टला यावर सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे. राजकुमार बंसल यांच्यासह अन्य आरोपींनी ही याचिका केली होती.

तक्रारीत काय म्हटले होते?

नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ईसीएल फायनान्स (ECL finanace) कंपनीच्या एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जाच्या परतफेडीसाठी आधी मदतीचे आश्वासन दिले मात्र नंतर सातत्याने पैशांची मागणी करत मानसिक त्रास दिला, त्यामुळेच कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी दाखल केली होती. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये देखील त्यांनी याच कंपनीवर मानसिक छळाचा आरोप केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -