Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकसिन्नर तालुक्यात भेसळयुक्त दूध बनवणा-या डेअरीचा पर्दाफाश

सिन्नर तालुक्यात भेसळयुक्त दूध बनवणा-या डेअरीचा पर्दाफाश

दुधात मिसळण्यात येणारा कपडे धुण्याचा सोडा, घातक रासायनिक पावडरचा मोठा साठा हस्तगत

<span;>सिन्नर : तालुक्यातील मिरगाव येथे मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध बनवणा-या डेअरीवर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.

<span;>दिनांक ०२/०९/२०२३ रोजी सकाळचे सुमारास वावी पोलीस ठाणे हद्दीतील मिरगाव येथील दूध संकलन केंद्रात काही इसम संशयास्पदरित्या ०२ किटल्यांमधून पांढरे रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण दुधात मिसळत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. सदर बातमीप्रमाणे ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मीरगाव येथील ओम सदगुरू दूध संकलन केंद्र येथे छापा टाकला.

<span;>सदर ठिकाणी डेअरी चालक  संतोष विठ्ठल हिंगे व  प्रकाश विठ्ठल हिंगे, दोन्ही रा. मीरगाव, ता. सिन्नर हे त्यांचे दूध संकलन केंद्रात संकलित झालेल्या दुधात पांढरे रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण टाकतांना मिळून आले, सदर ठिकाणाची पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याठिकाणी मिल्की मिस्ट नावाची रासायनिक पावडर व कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कॉस्टिक सोडा देखील मिळून आला. त्यानंतर पोलीस पथकाने डेअरी चालकाचे राहते घराची झडती घेतली असता, त्याचे घरी कॉस्टिक सोडा व डेअरीचे दूधात मिक्स करण्यासाठी वापरण्यात येणारी स्किम मिल्क पावडरचा साठा देखील मिळून आला.

<span;>सदर डेअरी चालकास मिल्की मिस्ट पावडरचा पुरवठा करणा-या हेमंत श्रीहरी पवार, रा. उजणी, ता. सिन्नर यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे गोडाऊनची झडती घेतली असता तेथे सुमारे ३०० गोण्या स्किम मिल्क पावडर, ०७ गोण्या कॉस्टिक सोडा असा एकूण ११ लाख रुपये किंमतीचा साठा आढळून आला आहे.

<span;>सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक यांचे मदतीने कारवाई सुरू असून वावी पोलीस ठाणे येथे संबंधिताविरुध्द भादवि कलम ३२८ व अन्न भेसळ अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

<span;>नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक  शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शनानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील, तसेच विशेष पथकातील पोलीस निरीक्षक  संजय गायकवाड, सपोनि प्रल्हाद गिते, सपोउनि शांताराम नाठे, दिपक आहिरे, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल, अनुपम जाधव, मेघराज जाधव, किशोर बोडके, साईनाथ सांगळे, भगवान काकड, मपोकों सविता फुलकर, चालक हेमंत वाघ यांचे पथकाने सदर कारवाई करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -