Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीDr Babasaheb Ambedkar Monument: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील स्मारक केंद्र सरकारडे हस्तांतरित...

Dr Babasaheb Ambedkar Monument: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील स्मारक केंद्र सरकारडे हस्तांतरित होणार

मुंबई: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे वास्तव्य असलेला लंडनमधील बंगला राज्य सरकार आता केंद्र सरकारच्या ताब्यात देणार असल्याचे समजते. सरकारने हा बंगला २०१५ मध्ये खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर केले होते. आता ही वास्तू केंद्र सरकार ताब्यात घेणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवले असून लवकरच मुख्यमंत्री कार्यालय संमती पाठवणार असल्याची माहिती सीएमओतील अधिकाऱ्याने दिली.

उत्तर लंडनमधील (London) किंग हेन्री रोडवरील या वास्तूत डॉ. आंबेडकर १९२१-२२ या काळात राहिले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने हा तीन मजली बंगला ३१ लाख पौंडमध्ये खरेदी केला होता. २०२० मध्ये त्याचे संग्रहालयात रूपांतर करून सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. आता परराष्ट्र मंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून ही वास्तू आपल्याकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारही त्याला सकारात्मक असून लवकरच ही प्रक्रिया पार पडेल.

या स्मारकाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘आपण ‘भारता’चे प्रतिनिधी म्हणूनच ही वास्तू खरेदी केली होती. आता भविष्यात त्याच्या प्रगतीसाठी केंद्राकडे हस्तांतरित करणे योग्य ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -