Sunday, May 19, 2024
Homeदेशघाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचे पालन करा : अदार पूनावाला

घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचे पालन करा : अदार पूनावाला

पुणे : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीनमधील कोविडची वाढती रुग्णसंख्या ही जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला यांनी भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. सोबतच मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे. याबाबत पूनावाला यांनी ट्वीट केले आहे.

“चीनमधील कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. परंतु आपलं उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांचं पालन केलं पाहिजे,” असे अदार पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -