Monday, May 20, 2024
Homeकोकणरायगडमुरुड समुद्रात तीन महिने डॉल्फिनचे दर्शन नाही

मुरुड समुद्रात तीन महिने डॉल्फिनचे दर्शन नाही

पर्यटकांमध्ये नाराजी

संतोष रांजणकर

मुरुड : मुरुड समुद्रामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून डॉल्फिनचे दर्शन झालेले नाही. अचानक डॉल्फिन दिसण्याचे बंद झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरल्याचे पाहावयास मिळत आहे. मुरुडचा जंजिरा किल्ला पाहण्या सोबत डॉल्फिन ही पाहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. २६ मे पासून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी बंद केल्यामुळे पर्यटक समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी थांबत आहेत; परंतु डॉल्फिनचे दर्शन होत नसल्याने नाराज होऊन परतत आहेत. त्यामुळे डॉल्फिनचे संवर्धन व्हावे ही काळाची गरज आहे.

मानवाकडून बेजबाबदारपणे समुद्रात केले जाणारे धोकादायक प्रदूषण, प्रकल्पा अंतर्गत वाढणारी वर्दळ, समुद्रातील जलचरांच्या एक प्रकारे जीवावर उठल्याचे चित्र दिसत असून मासळीचे प्रमाण घटते आहे. समुद्र किनारपट्टीवर किंवा समुद्रात जलक्रीडेने नेहमी मोहित करणारे डॉल्फिन दिसत नसल्याने चिंतेचा विषय बनला आहे. पर्यटन वृद्धीसाठी पर्यटकांचे निखळ मनोरंजन करणारा आणि भारतीय नौदलामध्ये ‘देवदूत’ ही भावना असणारे डॉल्फिन आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. डॉल्फिनचे दर्शन होत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.

तीन महिन्यांपूर्वी मुरुड, एकदरा, दिघी, राजपुरी समुद्र खाडीत नेहमी समुद्रातून शिट्यांचा आवाज काढीत उसळी मारणाऱ्या डॉल्फिनच्या जलक्रीडांचे दर्शन अनेकांना होत असे; मात्र मुरुडच्या किनाऱ्यावर डॉल्फिन येणे बंद झाल्याने ही धोक्याचा सिग्नल तर नाही ना? असा प्रश्न डोकावू लागला आहे.

भविष्यात येणारा धोका ओळखण्यात डॉल्फिन माहीर असतात अशी माहिती एकदरा गाव महादेव कोळी समाज अध्यक्ष तथा मुरुड तालुका मच्छिमार कृती समिती अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी बोलताना दिली. डॉल्फिन पाण्यात विहार करताना मार्ग शोधण्यासाठी सोनार ध्वनी लहरींचा वापर करतात. डॉल्फिनला वाचविणे काळाची गरज असल्याने भारत सरकारने उपलब्ध डॉल्फिन वाचवून संवर्धनासाठी आधिक उपाययोजना गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -